तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते आणि अण्णा समर्थकामध्ये शोकाचे वातावरण आहे. अशातच जयललिता यांच्या समर्थकांनी कोईंबतूर येथे सामूहिकपणे मुंडण करत आपला शोक व्यक्त केला आहे.
वाचा : जयललितांच्या निधनामुळे गडकरींच्या मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन साधेपणाने
जयललिता यांचे सोमवारी रात्री चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताच रविवारी संध्याकाळी त्यांना हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर, त्यांची प्रकृती सातत्याने चिंताजनक होती. अखेर काल रात्री ११.३०च्या सुमारास त्यांची अखेरचा श्वास घेतला. दरम्यान अम्मा यांच्या प्रकृतीची बातमी कळताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर रविवारी रात्रीपासूनच गर्दी केली. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी सोमवारपासून मंदिरात ठिकठिकाणी प्रार्थना केल्या.
#WATCH: Supporters in Coimbatore (Tamil Nadu) shave their heads in mourning after #Jayalalithaa's demise pic.twitter.com/BBaGFsRZyF
— ANI (@ANI) December 6, 2016
हजारो लोक यावेळी रुग्णायलयाच्या बाहेर त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत अश्रू ढाळत होते. जयललितायांच्या यांच्या निधनाची बातमी समजतात कार्यकर्त्यांचे अश्रू अनावर झाले. कोईंबतूर येथल्या अम्मा समर्थकांनी सामूहिक केशवपन करत आपले दु:ख व्यक्त केले. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर केशवपन करण्याची प्रथा भारतीय समजात आहे. जयललिता यांना मानणारा मोठा वर्ग तामिळनाडूत आहे. म्हणूनच त्यांना ‘अम्मा’ या नावाने संबोधले जाते. जयललिता यांच्या समर्थकांना त्या आईच्या स्थानी होत्या. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या निधनानंतर अशाप्रकारे आपला शोक व्यक्त केला आहे. तामिळनाडूनमध्येही त्यांच्या निधनानंतर सात दिवसांचा दुखवटा तर केंद्र सरकारने एकदिवसाचा दुखवटा जाहिर केला आहे.
Coimbatore (Tamil Nadu): Supporters shave their heads in mourning after the demise of #JJayalalithaa pic.twitter.com/hrhWYrgAoU
— ANI (@ANI) December 6, 2016