Surprise bride entry Video: सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसात मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्या लग्नात प्रत्येक इव्हेंटच अगदी स्पेशल असतो. तशीच खास तयारी केली जाते नवरा नवरीच्या लग्नमंडपात होणाऱ्या एन्ट्रीसाठी. हल्ली लग्न मंडपात वधूची एन्ट्री कशी असेल याकडे वऱ्हाडी मंडळीचं लक्ष लागून असतं. यासाठी काही विशेष व्यवस्थापन केलं जातं. कुटुंबीयांकडून काही दिवस डान्सचा सराव केला जातो आणि लग्नाच्या दिवशी सर्वांसमोर सादर केला जातो. गेल्या काही दिवसांपासून वधूच्या लग्नातील प्रवेशाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एक प्रसंग असा असतो, ज्यावेळी लग्नासाठी आलेले बहुसंख्य लोक नवरदेवाला आणि नवरीला पहिल्यांदाच पाहणार असतात. म्हणूनच तर लग्नमंडपात येण्याचा हा खास प्रसंग सगळ्यांना लक्षात रहावा आणि यादगार व्हावा, असा अनेकांचा प्रयत्न असतो.. अशीच एक धमाकेदार एन्ट्री केली आहे एका नवरीने.

लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. आता नवरा नवरीचा हात पकडत किंवा नवरी लाजत मान खाली घालून चालत प्रवेश करत नाहीत. अरेंज मॅरेज असो लव्ह मॅरेज असो… लग्नात नवरा-नवरीची एन्ट्री हा विषय पाहण्यासारखा झालाय. अशातच नवरीने तिच्या मैत्रीणींसोबत लग्नात मराठमोळ्या गाण्यावर डान्स करत जबरदस्त अशी एन्ट्री घेतली आहे. “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” या गाण्यावर नवरीनं केलेला डान्स सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होता.हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

डोक्यावर फुलांची चादर घेऊन येणारी किंवा डोलीत बसून येणारी नवरी आपण नेहमीच बघतो. किंवा नवरी येते आणि आजूबाजूला तिची भावंड, मित्रमैत्रिणी उभे राहतात आणि तिच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात, हे देखील आपण बऱ्याचदा पाहिलेलं असतं.. म्हणूनच तर डान्स करत करत नवरीने लग्न मंडपात एन्ट्री घेतली खूपच वेगळी ठरली आहे.व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, लग्न मंडपात वऱ्हाडी मंडळी वधूची वाट पाहात असतात. दरम्यान अचानक “आली ठुमकत नार लचकत’ गाणं वाजू लागतं. गाण्याबरोबरच वधूचे कुटुंबीय एक एक करत नाचत बाहेर येतात. शेवटी वधूची दमदार एन्ट्री होते. ती येताच तिच्यासोबत दोन नातेवाईक एकत्र नाचू लागतात

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Gavran_Tadka (@gavran_tadka1122)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरीचा हा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर झाला असून तो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत तुफान हीट झाला आहे. अवघ्या काही दिवसांतच या व्हिडियोला लाखो लाईक्स मिळाले असून नेटकरी पुन्हा पुन्हा हा सुंदर डान्स बघत आहेत.