सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर स्विगीच्या डिलीव्हरी बॉयचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आयुष्य प्रत्येकासाठी सारखं नसतं. सध्याचा सुरू असलेला पावसाळी माहौल आणि त्यात सायंकाळच्या वेळी चहासोबत फूड डिलिव्हरी अॅपवरून घर बसल्या मागवलेल्या स्नॅक्सवर ताव मारणं, याचा आनंद काही निराळाच असतो. पण तुम्हाला माहितेय का? तुम्ही मागवलेली फूड ऑर्डर घरी पोहोचवण्यासाठी फूड डिलिव्हरी बॉयला कोणत्या कोणत्या संघर्षाचा सामना करावा लागतो. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

ट्रॅफिक पॉईंटवर थांबलेल्या एका स्विगी डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाचेही हृदय पिघळून जाईल. ग्राहकाने ऑर्डर केलेली फूड डिलिव्हरी वेळेत पोहोचली पाहिजे म्हणून हा स्विगी डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात वाटेत भिजताना दिसतोय. हा व्हिडीओ बारकाईने लक्षात येतं की त्याच्याकडे पावसात वापरण्यासाठी रेनकोटच नाही. तो तसंच बाईकवर बसून वाहतूक कोंडी सुटण्याची वाट पाहत आहे. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहतुक संथ झाली होती. तो पावसात भिजतोय पण त्याने कसलीही पर्वा न करता आपलं काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक कोंडी सुटण्याची वाट बघत पावसात भिजत बसला होता.

आणखी वाचा : निष्काळजीपणाचा कळस! विमानातल्या जेवणात सापाचं डोकं, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ इस्टाग्राम वापरकर्ता दिनेश कोमा याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्याच्या जिद्दीला सलाम करत असून हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ कुठे रेकॉर्ड करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, पण व्हिडीओ पाहून लोक आयुष्यातील संघर्षावर आपली वेगवेगळी मते शेअर करू लागली आहेत.

आणखी वाचा : कोणतंही सुरक्षा साधन न वापरता डोंगर चढतात हे भिक्खू, हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बापरे! HCL च्या सीईओचा पगार किती आहे माहितेय का? पॅकेजमध्ये आहेत इतके शून्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिलिव्हरी बॉयच्या या जिद्दीला पाहून नेटकऱ्यांकडून खूप प्रशंसा मिळाली. हा व्हिडीओ पाहून लोकांचे हृदय फुलून आले आणि लोक डिलिव्हरी बॉयचं प्रचंड कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यात लढत असतो आणि आपण नेहमी फायटरचा आदर केला पाहिजे.