Viral video: जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही. पण तुम्ही कधी एका वाघाची दुसऱ्या वाघासोबत झालेली लढत पाहिली आहे का. होय, असाच काहीसा प्रकार घडला आहे. दोन वाघांमध्ये जीवघेणी लढाई झाली. दोघांनीही एकमेकांवर जोरदार हल्ले-प्रतिहल्ले केले. शेवटी या युद्धात कोण जिंकलं हे आता तुम्हीच पाहा.

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे वाघांचे हमखास दर्शन होते. नुसते दर्शनच नाही तर कधी कधी त्यांची लढाईसुद्धा पाहायला मिळते. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोन वाघांमध्ये अतिशय कडवी झुंज लागली आहे. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही हेच या माकडाने ओळखलं आणि वाघाशी दोन हात केले.

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या वाघांचं नाव बेला आणि वीरा असं आहे. ही लढाई ताडोबा-अंधारी नॅशनल पार्कमध्ये झाली.या व्हिडिओमध्ये दोन्ही वाघ आपापसात भांडताना दिसत आहेत. १२ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दोन्ही वाघ एकमेकांवर हल्ला करत असल्याचे पाहू शकता. त्या दोघांची गर्जना ऐकून तुम्ही कल्पना करू शकता की ते किती रागावलेले आहेत आणि किती जीवघेणे भांडत आहेत. लढाई दरम्यान, त्याची गर्जना खूप जोरात असते, जी समोरून ऐकणाऱ्या कोणालाही घाबरवते. यात दोन वाघ आपल्या जिवाच्या आकांताने थरारक लढत देताना दिसून येत आहेत. एकमेकांना भलेमोठे पंजे, लाथाबुक्के मारल्यानंतर शेवटी हे दोघेही आपले युद्ध तिथेच थांबतात आणि आपापल्या वाटेला निघून जातात. त्यांची ही लढत फार कमी काळ जरी टिकली असली तरी श्वास रोखून धरणारी होती.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: एक चुकीचं पाऊल अन् रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; समुद्रात बोटीवर चालता चालता तरुणाबरोबर भयंकर घडलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघांच्या या लढतीचा व्हिडिओ @ranthambhorepark नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘वाघांची लढाई’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला ४० हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, अस्तित्वासाठी जंगलाच्या दोन वाघांची झुंज तर आणखी एकानं ‘शिकार करो या शिकार बनो’अशी प्रतिक्रिया दिली आहे.