Tata Capital IPO: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. वर्ष २०२५ मधील भारतातील सर्वात मोठा आयपीओ, टाटा कॅपिटल, सोमवार, ६ सप्टेंबर रोजी म्हणजे अवघ्या काही मिनिटात सबस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे. याआधी एचडीबी फायनान्शियलने १२,५०० कोटींचा इश्यू बाजारात लाँच केला होता. Tata Capital IPO मध्ये बुधवार, ८ ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येईल.
८ ऑक्टोबरपर्यंत करू शकता गुंतवणूक
टाटा कॅपिटलचा आयपीओ सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला असून तो ८ ऑक्टोबरपर्यंत खुला राहील. याचा अर्थ गुंतवणूकदार तीन दिवस बोली लावू शकतील. टाटा कंपनी आयपीओ अंतर्गत ४७,५८,२४,२८० शेअर्ससाठी बोली मागवत आहे. यामध्ये २१,००,००,००० नवीन शेअर्सचा समावेश आहे, ज्यांचं मूल्य ₹६,८५६ कोटी आहे, तर २६,५८,२४,२८० शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (ओएफएस) विकले जात आहेत, ज्याचं मूल्य ₹८६६५.८७ कोटी आहे. यामुळे टाटा कॅपिटलच्या आयपीओची साईज १५,५११.८७ कोटी झाली आहे.

किती आहे प्राईज बँड?
टाटा कॅपिटलच्या आयपीओच्या प्राईज बँडबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने तो ₹३१०-₹३२६ प्रति शेअर असा निश्चित केला आहे. टाटाचा आयपीओ या वर्षी आतापर्यंत लाँच झालेला सर्वात मोठा इश्यू असेल. एचडीबी फायनान्शियलचा जूनमध्ये मागील आयपीओ १२,५०० कोटींचा होता, परंतु टाटा कॅपिटलच्या ₹१५,५११.८७ कोटींच्या इश्यू साईजनं त्याला मागे टाकलं आहे. आयपीओसाठी अलॉटमेंट प्रक्रिया ९ ऑक्टोबर रोजी सुरू होईल आणि शेअर बाजारात हा आयपीओ १३ ऑक्टोबर रोजी लिस्ट होण्याची शक्यता आहे.