TC and Passenger Argument Viral Video: सोशल मीडिया हे मनोरंजनाचे अथांग सागर म्हणून ओळखले जाते. दररोज असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात काही व्हिडीओ मनोरंजक, महितीपूर्ण तर काही व्हिडीओ घटनांवर आधारित असतात. एकंदरीत सर्व प्रकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यात बरेचसे व्हायरल व्हिडीओ हे भांडणाशी संबंधित असतात. आपल्या देशात कोट्यवधी नागरिक दररोज रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे हा दळणवळणासाठी लोकप्रिय आणि स्वस्त पर्याय आहे. रेल्वेने प्रवास करताना अनेक अनुभव येतात. बऱ्याचदा ट्रेनमध्ये प्रवास करताना व्यक्तींमध्ये भांडण झाल्याच्या घटनाही घडतात. 

तुम्ही सर्वांनी भारतीय रेल्वेने प्रवास केला असेलच. तिथली हवा, वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांचा आवाज आणि चहाचे घोट एक वेगळीच अनुभूती देते. पण, अनेक वेळा ट्रेनमध्ये प्रवास करताना लोकं वाद घालताना दिसतात, अनेक वेळा टीसीसोबतही वाद घालताना दिसतात. भारतीय रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणे हा दंडनीय अपराध आहे, त्यामुळे रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड घेतला जातो. या कामासाठी रेल्वेने टीटीई आणि टीसी यांना नियुक्त केले आहे. 

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका धावत्या रेल्वेतील आहे. व्हिडीओमध्ये एक टीसी आणि प्रवासी वाद घालताना दिसत आहेत. दोघांमध्ये ओळखपत्रावरून हाणामारी झाली, त्यात टीसीने ओळखपत्राची हार्ड कॉपी मागितली, त्यावर प्रवाशाने सॉफ्ट कॉपी दाखवली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होतो आणि हा वाद सोशल मीडियावर रंगला.

(हे ही वाचा : “मी सीट का देऊ…” रेल्वेत पुरुषाने फटकारल्यावर बसू न देण्यावरून महिलेकडून गदारोळ; VIDEO पाहून लोकांनी कुणाला सुनावले?)

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये टीसी आणि प्रवासी यांच्यात वाद झालेला दिसून येतो. टीसीने प्रवाशाला ओळखपत्राची हार्ड कॉपी मागितली, यावर प्रवाशाने हार्ड कॉपी नसल्याचे उत्तर दिले. टीसीने असं चालणार नाही असे त्याला म्हटले आणि हार्ड कॉपीची मागणी केली. यावर प्रवाशाने सॉफ्ट कॉपीने तुम्हाला काय अडचण आहे, असे म्हटले. यावर कोणताही पर्याय निघाला नाही आणि हा वाद चांगलाच पेटला.

येथे पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Explore life with me (@live_vibe._)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशा स्थितीत एका युजरने लिहिले आहे की, “ज्या वेळी टीसी वाद घालत आहे, त्यावेळी प्रवाशाने डिजी लॉकर उघडून दाखवायला हवे होते.” त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे भाऊ, तुम्हीही फिजिकल कॉपी मागवा.” हा व्हिडीओ ‘लाइव्हविब’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.