Viral Video : मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर नातं आहे. एक चांगला मित्र मिळणे, नशीबाचा भाग आहे. सोशल मीडियावर मैत्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्यो दोन वृद्ध मित्र निवांत चहा पिताना दिसत आहे.
असं म्हणतात, मैत्री लहानपणीची असो की म्हातारपणाची नेहमीच खास असते. या मैत्रीमध्ये एकमेकांविषयी जिव्हाळा, प्रेम आणि काळजी दिसून येते. सध्या व्हायरल व्हिडीओमधील दोन आजोबांची मैत्री पाहून तुम्हीही भारावून जाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन आजोबा चहा पिताना दिसत आहे. दोघेही चहाचा आस्वाद घेताना दिसत आहे.दोघांची चहा पिताना छान गप्पा रंगल्या आहेत.या वृद्ध मित्रांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “एकच असावा आपण चुकीचे असो किंवा बरोबर तो सोबत असावा”

हेही वाचा : VIDEO : किती तो निरागसपणा! आरशात पाहून स्वत:वरच भुंकत होता कुत्रा, पाहा मजेशीर व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कायम सोबत” तर एका युजरने लिहिलेय, “जीव” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.