Teacher Dance Viral Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी डान्स रील्स, कधी जुगाडच्या रील्स, तर कधी स्टंटबाजीचे व्हिडीओ आपण पाहतो. त्याशिवाय हल्ली शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांसह त्यांच्या शिक्षकांच्या डान्सचे व्हिडीओजदेखील तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतात. सध्या असाच एक कॉलेजातील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका उत्साही प्राध्यापकाने भरकॉलेजमध्ये विद्यार्थी अन् शिक्षकांसमोर असा काही जबरदस्त डान्स केला आहे की, पाहून तुम्हीही म्हणाल, सरांसमोर मायकल जॅक्सनदेखील फेल ठरेल.
प्राध्यापकाचा जबरदस्त डान्स!
व्हायरल व्हिडीओ बंगळुरू येथील ग्लोबल अकादमी ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमधील आहे. त्यात एक प्राध्यापक शेकडो विद्यार्थ्यांसमोर मायकल जॅक्सनप्रमाणे एकापेक्षा एक भारी अशा डान्स स्टेप्स करताना दिसतोय. शिक्षकाच्या डान्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कॉलेज विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेले आहे. त्या प्रसंगी एक प्राध्यापक सर्वांसमोर दिलखुलासपणे नाचताना दिसतोय. यावेळी तो सेम मायकल जॅक्सनसारख्या परफेक्ट डान्स स्टेप्स करताना दिसतोय. त्याच्या परफेक्ट डान्स स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्सना तर तोडच नाही. त्या भन्नाट डान्सने आतापर्यंत अनेकांची मने जिंकली आहेत. या प्राध्यापकाने मायकल जॅक्सनच्या पॉप म्युझिकवर या जबरदस्त डान्स स्टेप्स करून दाखवल्या. त्याचा हा डान्सचा उत्साह अन् एनर्जी तरुणांनाही लाजवेल अशी आहे. कारण- त्यांची प्रत्येक डान्स स्टेप क्लीअर ॲण्ड क्लीन होती.

प्राध्यापकाचा हा डान्स अन् एनर्जी पाहून उपस्थित विद्यार्थीही जोरजोरात टाळ्या अन् मोठमोठ्याने शिट्या वाजवताना दिसताहेत.

विशेष म्हणजे या प्राध्यपकाचा आणखी एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते तेलुगू चित्रपट ‘आरआरआर’मधील नाटू-नाटू गाण्यावर एका पुरुषाबरोबर नाचताना दिसतायत. प्राध्यपकाचा हा भन्नाट डान्स व्हिडीओ @gatalbum नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे, ज्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. प्राध्यापकाच्या दमदार डान्सचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

View this post on Instagram

A post shared by ?? (@gatalbum)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोक व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिलेय की, सरांनी चुकीचा पेशा निवडला आहे. दुसऱ्या एकाने लिहिले की, त्यांनी नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी त्यांच्या कलेचा त्याग केला. तिसऱ्याने लिहिलेय की, असे दिसते की, हे जबरदस्तीने प्राध्यापक बनलेत. पण प्रोफेसरांचा हा डान्स व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट्स करून आम्हाला सांगा.