Teacher Student Dance Viral Video: सोशल मीडियावर लाखो लोकांना वेड लावणारा एक भन्नाट VIDEO सध्या तुफान गाजतोय. सुरुवातीला तो साधासुधा डान्स व्हिडीओ वाटतो; पण काही सेकंदांतच दृश्य बदलतं आणि पाहणाऱ्यांचा जीव थेट गोंडस क्यूटनेसच्या प्रेमात अडकतो. कारण- या व्हिडिओत दिसते एक साधीशी शाळेची शिक्षिका… पण तिच्यासोबत जेव्हा एकामागोमाग छोटे-छोटे विद्यार्थी थिरकायला लागतात, तेव्हा तो क्षण इतका हृदयाला भिडतो की, प्रेक्षकांच्या डोळ्यांत चमचमते आनंदी तारे दिसू लागतात. नेटिझन्सनं तिला ‘या ट्रेंडची खरी क्वीन’ ठरवलं आहे. पण, शेवटचा सीन पाहिल्यावर तर सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू फुटलं आणि ही Reel थेट करोडोंच्या हृदयात घर करून बसली…

सोशल मीडियावर सध्या एक जबरदस्त व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपसूकच हास्य उमटतंय आणि प्रत्येकालाच हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतोय. कारणही खास आहे. सिक्कीममधील एका शिक्षिकेनं आपल्या गोंडस विद्यार्थ्यांसोबत ठुमक-ठुमक या ट्रेंडिंग गाण्यावर असा डान्स केला आहे की, पाहणाऱ्यांनी थेट तिला ‘या ट्रेंडची खरी विजेती’ ठरवलं आहे.

जिथे बहुतांश लोकं आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत हा ट्रेंड करताना दिसले, तिथे या शिक्षिकेनं वेगळा ट्विस्ट देत आपल्या लहानग्या विद्यार्थ्यांनाही यात सहभागी करून घेतलं. तेवढंच नाही तर तिच्या या भन्नाट आयडियानं हा व्हिडीओ आणखीनच गोड आणि हृदयाला भिडणारा बनला आहे.

व्हिडीओत सुरुवातीला शिक्षिका पांढऱ्या शर्ट आणि ब्राउन पँट या वेशामध्ये उभी दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक आपुलकीची स्मितरेषा झळकत असते. ती गाण्याच्या प्री-कोरसवर थिरकायला लागते आणि मग तिच्यामागून एकेक करून छोटे छोटे विद्यार्थी रांगेत सामील होऊ लागतात. शाळेचं आय-कार्ड अन् गणवेश घातलेली ही मुलं जेव्हा ठुमक-ठुमकवर डान्स करू लागतात, तेव्हा क्यूटनेसचा डोस इतका वाढतो की, प्रेक्षक थेट फिदा होतात.

इन्स्टाग्राम युजर्सनी हा व्हिडीओ मनापासून पसंत केला. एका युजरनं मजेशीर कमेंट केली– “माझ्या टीचर्सनी मला फक्त मारलंय आणि इथं शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत डान्स करतेय!” दुसरा म्हणाला, “प्रत्येक विद्यार्थी जसजसा सामील होतोय, तसा व्हिडीओ क्यूट होत चाललाय.” तर काहींनी हा व्हिडीओ “मनमोहक” आणि “दिल को छू लेनेवाला” असल्याचं म्हटलं.

नेहा भसीन हिचंही या व्हिडीओकडे लक्ष वेधलं गेलं आणि तिनं त्यावर स्वतःची प्रतिक्रिया नोंदवली. छोट्या मुलांच्या मजेदार डान्स मूव्हज पाहून लोक अक्षरशः हसून लोटपोट होत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

आश्चर्य म्हणजे हा व्हिडीओ ८ सप्टेंबर २०२५ रोजी अपलोड करण्यात आला होता. आतापर्यंत तब्बल १.९३ कोटी लोकांनी तो पाहिला आहे आणि २३ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. काही सेकंदांचा हा व्हिडीओ आज लाखोंच्या मनात अमीट ठसा उमटवून गेला आहे.