शिक्षकांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पालक मुलांवर संस्कार करतात; तर शिक्षक मुलांना घडवतात. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना ओरडतात, घरी गृहपाठ करण्यासाठी देतात तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना त्या अभ्यासाचा कंटाळा येतो आणि त्या शिक्षकांचा राग येतो. पण, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने तितक्याच महत्त्वाच्या असतात. आज सोशल मीडियावर अशाच एका शिक्षकाची पोस्ट व्हायरल होत आहे; जी वाचून तुम्हीसुद्धा नक्कीच भावूक व्हाल.

सँड्रा व्हेनेगास या तरुणीच्या वडिलांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. तरुणीचे वडील एक शिक्षक होते. दवाखान्यात जाताना वडिलांनी त्यांच्या बॅगेत लॅपटॉप आणि चार्जर आदी साहित्यसुद्धा ठेवले. कारण- त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना वचन दिले होते की, ते सर्व विद्यार्थ्यांच्या असाइनमेंटला ग्रेड (गुण) देणार. त्या शिक्षकाची तब्येत इतकी खराब होती की, त्यांना दवाखान्यात आपत्कालीन कक्षात ठेवण्यात आले होते. तरीसुद्धा दवाखान्यातील बेडवर बसून, त्यांनी विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट किंवा प्रकल्पांना (Assignment) ग्रेड दिल्या आणि दुसऱ्या दिवशी त्या शिक्षकाचा मृत्यू झाला.

हेही वाचा…अनोखा कौटुंबिक व्यवसाय! ‘या’ शहरात संपूर्ण कुटुंब चालवतात एक दुकान अन् २४ तास करतात काम; पाहा व्हायरल पोस्ट…

पोस्ट नक्की बघा :

विद्यार्थ्यांना ग्रेड देत असताना त्यांच्या मुलीने या भावूक क्षणाचा फोटो काढून घेतला होता आणि वडिलांच्या मृत्यूनंतर तिने हा फोटो शेअर करीत कॅप्शन लिहिली की, शिक्षक हे नेहमीच त्यांच्या क्षेत्रात अधिक वेळ काम करतात. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे किंवा अभ्यासाची उजळणी घेणे यासाठी एक्स्ट्रा तास ठेवले जातात. तसेच लॉकडाउनमध्येही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम न थांबवता, स्वतःचे कर्तव्य पूर्ण केले. आपली प्रतिक्रिया मांडतानाच तिने या क्षेत्रातील सर्व शिक्षकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट @Be Amazed या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे; ज्यात तुम्ही पाहू शकता की, तरुणीचे वडील आपत्कालीन कक्षात बेडवर बसून हातात लॅपटॉप घेऊन विद्यार्थ्यांच्या असाइनमेंटना ग्रेड देताना दिसत आहेत; जे पाहून कोणाच्याही डोळ्यांत नक्कीच पाणी येईल.