Lake Swimming Python Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. एका तलावात लोक शांततेचा आणि थंड पाण्याचा आनंद घेत होते, तिथे अचानक काहीतरी पाण्यावर तरंगताना दिसतं. सुरुवातीला कोणीच गांभीर्याने घेत नाही, पण क्षणभरातच लक्षात येतं. ते काही झाडाचं खोड नाही, तर एक भलामोठा अजगर आहे. हळूहळू तो अजगर तलावात पोहणाऱ्या लोकांच्या जवळ येतो आणि मग सुरू होतो धावपळीचा खेळ. लोक जीव वाचवण्यासाठी धावत सुटतात. पण त्याचवेळी एक युवक थांबतो आणि घेतो अजगराला थांबवण्याचा धाडसी निर्णय; पण काय झालं पुढे? जाणून घ्या..
नेमकं काय घडलं?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एका तलावामध्ये लोक मजा-मस्ती करताना दिसत आहेत. वातावरण अगदी आनंदी आणि शांततामय असताना, अचानक काहीतरी पाण्यावर तरंगताना दिसतं. सुरुवातीला लोकांना वाटतं की ती एखादी काठी किंवा झाडाची वेल असेल… पण काही क्षणांतच सत्य उघड होतं. की तो होता एक भलामोठा अजगर.
अजगराचं थरारक आगमन
हा अजगर जसजसा पोहणाऱ्या लोकांच्या जवळ येतो, तसतशी तलावामधील मस्ती घाबरगुंडीमध्ये बदलते. अनेक जण घाबरून झपाट्याने पाण्यातून बाहेर पडतात. मात्र, एक युवक धाडस दाखवत तिथेच उभा राहतो आणि अजगराला दगड मारून घालवण्याचा प्रयत्न करतो. काही क्षण अजगर दूर असतो, पण अचानक तो थेट त्या युवकाच्या दिशेने सरकू लागतो.
धाडस की मूर्खपणा?
जसा अजगर जवळ येतो, तसे त्या युवकालाही धडकी भरते आणि तोही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तलावाबाहेर पळतो. सगळं घडलं काही सेकंदांत. निसर्गाचं हे दृश्य किती अनपेक्षित आणि धोकादायक असू शकतं, याचं हे जिवंत उदाहरण ठरतं.
व्हिडीओ पाहून थक्क झाले नेटिझन्स
हा धक्कादायक व्हिडीओ rajkumar_pal92 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, याला हजारो व्ह्युज आणि शेकडो प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींनी युवकाच्या धाडसाचं कौतुक केलं, तर काहींनी स्पष्ट म्हटलं, “अजगरासारख्या प्राण्यांपासून लांबच राहणं शहाणपणाचं!”
येथे पाहा व्हिडीओ
निसर्गात थोडीशी असावधता ठरू शकते जीवघेणी
हा व्हिडीओ केवळ थरारक नाही, तर निसर्ग किती अनपेक्षित आणि भयावह असू शकतो, याचीही जाणीव करून देणारा आहे. निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना किती काळजी घ्यावी लागते ते हे दृश्य स्पष्टपणे दाखवून देतं