Black Cobra Viral Video: सापांविषयी ऐकलं की, माणसाला अंगावर काटा येतो. त्यांचं फुसफुसणं, वळण घेणारी लांबलचक देहयष्टी आणि क्षणार्धात वार करण्याची ताकद हे सगळंच भयंकर वाटतं. पण, खरी गोष्ट अशी आहे की, जगातील बहुतांश साप विषारी नसतात. तरीही त्यांच्या भीतीचं कारण एकच “कधी कुठला साप जीवघेणा ठरेल ते सांगता येत नाही.

सापाचं नाव घेताच सर्वांनाच घाम फुटतो. त्यामुळे सापापासून प्रत्येक जण दोन हात लांब राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पायाखालून चुकून जरी कधी साप गेला, तर दोन दिवस आपल्याला नीट झोप लागत नाही. सापाबद्दल एवढी भीती प्रत्येकाच्या मनात आहे. पण, जर समोर ब्लॅक कोब्रा फणा काढून उभा असेल, तर कल्पना करा त्या क्षणाचं भय काय असेल. सध्या सोशल मीडियावर एक असाच थरकाप उडवणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगी दरवाजा उघडते आणि समोर तिच्यासमोर थेट एक फुत्कारणारा काळा नाग उभा असतो. हा थरकापजनक व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

 काय आहे व्हिडीओत?

व्हिडीओच्या सुरुवातीला एक बंद दरवाजा दिसतो. दरवाजाच्या बाहेर जमिनीवर फणा काढून एक मोठा काळा कोब्रा शांतपणे बसलेला असतो आणि तेवढ्यात आतून एक लहानशी चिमुरडी दरवाजा उघडते. तिच्यासमोरचा दृश्य पाहून कोणाच्याही काळजात धस्स होईल. कोब्रा तिला पाहताच फणा उंचावतो आणि थेट तिच्या दिशेने सरकायला लागतो.

मुलगी एक क्षण थक्क होते, घाबरते आणि तिथून धावत सुटते. सुदैवानं त्या चिमुकलीच्या पायांइतपतही साप पोहोचत नाही. त्यानंतर साप थोडा पुढे सरकतो आणि व्हिडीओ तिथेच संपतो. पण त्या काही क्षणांनी प्रेक्षकांचं हृदय जोरात धडधडायला लावतं.

व्हिडीओवर प्रचंड प्रतिसाद

@dientuhaitien या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत २९ लाखांहून अधिक व्ह्युज आणि ४६ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. लोक कमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एकाने लिहिले, “मुलगी अत्यंत नशिबवान आहे!” दुसऱ्याने म्हटलं, “फर्शमुळे साप पटकन वळू शकला नाही, म्हणूनच ही मुलगी वाचली.” तर काहींनी फक्त “OMG” असं लिहून भीती व्यक्त केली.

ही घटना सांगते की जीवनात संकट कधी कुठून समोर येईल सांगता येत नाही. पण त्या क्षणाचं धैर्य, नशीब आणि सजगता हेच माणसाचं वाचवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

या व्हिडीओनं हजारो लोकांना हादरवलं आणि पुन्हा एकदा आठवण करून दिली की काळजी न घेतल्यास चुकांचं आयुष्यभर परिणाम होतो.