Eagle Catches Baby Deer: लहानपणी नेहमी मोठी मंडळी सांगायची, “दुपारी छपरावर झोपू नको, नाही तर गरुड डोळे उपटून घेऊन जाईल.” तेव्हा ती गोष्ट ऐकून अंगावर काटा यायचा. पण, ती फक्त भीतीदायक गोष्ट आहे, असं वाटायचं; मात्र, प्रत्यक्षातही गरुड तितकाच ताकदवान आणि धोकादायक शिकारी आहे हे आता एका व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट झालं आहे.

निसर्ग हा जितका सुंदर, तितकाच भीषण आणि थरारकही असतो. हिरव्यागार जंगलात, शांत डोंगरदऱ्यांमध्ये किंवा आकाशाच्या अथांग उंचीवर घडणाऱ्या काही दृश्यांनी माणसाचा अक्षरशः थरकाप होतो. सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यानं नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. त्यामध्ये आपण पाहत असलेली घटना एखाद्या थरारपटातलं दृश्य तर नाही ना, असा क्षणभर वाटून जातं; पण ती आश्चर्यकारक घटना तर प्रत्यक्षात आपल्यासमोरच्या व्हिडीओतील दृश्यात घडत असते. त्यामध्ये दिसते की, एका मोठ्या शक्तिशाली गरुडानं अचानक झेप घेतली आणि थेट एका निष्पाप हरणाच्या पिल्लावर झडप घेतली. क्षणार्धातच त्यानं त्या पिल्लाचा गळा आपल्या धारदार नखांमध्ये इतका घट्ट पकडला की, पाहणाऱ्यांचा श्वासच अडकला.

काही सेकंदांतच ते पिल्लू हवेत लोंबतंय आणि गरुड त्याला सोबत घेऊन, डोंगराच्या उंच शिखराकडे झेपावताना दिसतोय… हे दृश्य इतकं भयभीत करणारं आहे की, कमकुवत मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहूच न. कारण- तो पाहताना अंगावर शहारे येतात आणि काळजाचा ठोकाही चुकू शकतो. ही केवळ शिकार नाही, तर निसर्गातील निर्दय वास्तव आहे, जे दाखवून जातं की, आकाशाचा खरा राजा गरुडच आहे.

शहारे आणणारे भयानक दृश्य

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत एक मोठा शक्तिशाली गरुड डोंगराळ भागात शिकार शोधत फिरताना दिसतो. अचानक खाली गवतामध्ये भटकणाऱ्या हरणाच्या एका लहान पिल्लावर त्याची तीक्ष्ण नजर पडते. मग काय क्षणाचाही विलंब न लावता, तो गरुड विजेच्या वेगाने खाली झेपावतो आणि थेट हरणाच्या पिल्लाचा गळा आपल्या धारदार नखे असलेल्या पंजांमध्ये घट्ट पकडतो. पुढच्याच क्षणी तो त्या पिल्लाला उचलून, अवकाशात उड्डाण करतो.

हा थरार पाहून अंगावर येईल काटा!

हरणाचं पिल्लू बिचारं गरुडाच्या दणकट पंजांतून सुटण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत असतं; पण ती तर गरुडाच्या पंजांची पकड असते. मग त्यातून सुटणं म्हणजे अशक्यप्राय बाब. पाहता पाहता गरुड त्या पिल्लाला आकाशात लोंबकळत ठेवून, उंचावर घेऊन जातो. हे दृश्य पाहणाऱ्यांच्याही हृदयाची धडधड वाढवणारं आहे. खरोखरच कमकुवत मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये. कारण- तो पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकू शकेल.

VIDEO वर आश्चर्याच्या भावनांचे पडसाद

हा थरारक व्हिडीओ @crazymoment या X (Twitter) अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे आणि आतापर्यंत दोन दशलक्षांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ शेअर करून आश्चर्य व्यक्त केलं आहे.

गरुड किती धोकादायक शिकारी आहे?

गरुड हा Accipitridae या शिकारी पक्ष्यांच्या प्रजातीतील आहे. या परिवारात बहिरी ससाणा, गरुड, गिधाड व बाज यांचा समावेश होतो. बहिरी ससाणा आकाराने खूप मोठा, सामर्थ्यवान व अतिशय वेगवान पक्षी आहे. तो शिकार पंजांमध्ये पकडल्यानंतर सर्वप्रथम त्याच्या डोळ्यांवर हल्ला करतो, ज्यामुळे शिकार अर्धमेली होते आणि तिला सुटण्याची संधी मिळत नाही.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून हे नक्की लक्षात येतं की, जंगलाचा राजा जरी सिंह असला तरी आकाशाच्या साम्राज्याचा राजा गरुडच आहे.