सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, या व्हिडीओंमध्ये काही असे असतात जे आपणाला भावतात. या व्हिडीओंमध्ये कधी माणसांच्या प्रामाणिकतेचं आणि दयाळूपणाचं दर्शन आपणाला होत असतं. कधी पाण्यातून वाहत जाणाऱ्या कुत्र्याला माणसांनी वाचवल्याचे तर कधी वाट चुकलेल्या हरणाला जंगलात सोडल्याचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. अशातच आता एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्हाला अजूनही लोकांमध्ये माणुसकी जिवंत असल्याचं पाहायला मिळेलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही पाहा- पोलिसांनाच बंदूक लोड करता येईना, अधिकाऱ्याने लावला डोक्याला हात; Video पाहून हसू आवरणार नाही

हा व्हिडीओ एक रुग्णवाहिका रात्री उशिरा बंद पडल्यानंतर दोन दुचाकीस्वारांनी ढकलत तिला हॉस्पिटलपर्यंत पोहचवल्याचा आहे. हा व्हिडीओ खूप जुना असला तरी तो पुन्हा व्हायरल झाला आहे. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी या घटनेचा व्हिडीओ नव्याने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताच तो नेटकऱ्यांना भावल्याचं पाहायला मिळतं आहे.

हेही पाहा- दोन ट्रकच्यामध्ये सापडली कार अन पुढल्याच क्षणी…, ‘या’ अपघाताचा Video पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल

हा व्हिडिओ जुना असून तो दिल्लीत रेकॉर्ड करण्यात आला होता. मूळ पोस्टनुसार, एका गंभीर रुग्णाला दिल्लीच्या डीडीयू हॉस्पिटल, हरी नगर येथून आरएमएल हॉस्पिटलमध्ये हलवले जात असताना मध्येच रुग्णवाहिका बंद पडली. रात्री उशिरा रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे ती दुरुस्त करणंही अशक्य होतं. अशातच या दोन दुचाकीस्वारांच्या मदतीमुळे रुग्णाला रुग्णालयात नेण्यात आले.

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रात्री उशिरा रुग्णवाहिका बिघडली. यावेळी दोन दुचाकीस्वार देवदूत बनून आले आणि त्यांनी रुग्णवाहिकेला सुमारे १२ किलोमीटरपर्यंत ढकलून मदत केली.’ हा व्हिडिओ ९४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तर नेटकऱ्यांनी या व्हिडीओतील दोन तरुणांचे खुप कौतुक केलं आहे. शिवाय या दोन तरुणांनी केलेल्या कृत्यामुळे माणुसकी अद्याप जिवंत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर एका युजरने ही माणसे रुग्णांसाठी देवदूतांपेक्षा कमी नसल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The ambulance carrying the patient broke down the bikers pushed him 12 km to the hospital jap
First published on: 28-12-2022 at 17:04 IST