Viral Video: लग्न म्हणजे वधू आणि वर यांच्या आयुष्याचा नवा प्रवास. लग्न सोहळा थाटामाटात पार पडण्यापूर्वी अनेक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात येतात आणि या प्रत्येक कार्यक्रमाचे खास महत्वसुद्धा असते. तर सध्या प्री-वेडिंग शूटसुद्धा अनेक तरुणांची पहिली पसंती आहे. लग्न ठरलेलं जोडपं लग्नाआधी विविध ठिकाणी जाऊन, अनोख्या थीमवर खास कपडे परिधान करून, विविध पोझमध्ये फोटो काढतात. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक बोटचालक एका जोडप्याला पोझ कश्या द्यायच्या याचं प्रशिक्षण देत आहे.

व्हायरल व्हिडीओ आंध्र प्रदेशचा आहे. एका जोडप्याला प्री-वेडिंग शूट करायचे असते. यादरम्यान ते एक बोट भाड्याने घेतात. थोड्या वेळाने जोडपं बोटीत चढतात आणि त्यांच्या प्री-वेडिंग फोटोशूटला सुरुवात करतात. मात्र, या बोटीचा चालक खूपच हुशार असतो. प्री-वेडिंग फोटोशूट सुरू होताच तो जोडप्याला मार्गदर्शन करण्यास सुरुवात करतो. बोटचालकाने सांगितल्याप्रमाणे जोडपंसुद्धा त्याचे अनुकरण करू लागतो व अशा खास पद्धतीत फोटोशूट सुरू असते. बोटीवर सुरू असलेलं हे अनोखं प्री-वेडिंग शूट एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…आज शोले चित्रपटाचे शूटिंग झाले असते तर… युजरच्या त्या पोस्टवर आनंद महिंद्रांनीही दिलं फिल्मी स्टाईलमध्ये उत्तर

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तलावाच्या कडेला बोटीवर प्री-वेडिंग शूट सुरू असते व जोडप्याला प्रशिक्षण देण्यासाठी बोटचालकसुद्धा सज्ज झालेला दिसतो आहे. अनेक वेळा फोटोशूटदरम्यान फोटोग्राफर जोडप्याला विविध पोझ सांगत असतात. पण, आजच्या व्हिडीओत बोटचालकाने कमाल केली आहे. त्याने एखाद्या दिग्दर्शकाप्रमाणे वेगवेगळ्या, आकर्षित व रोमांचक पोझ कशा द्यायच्या याचे खास प्रशिक्षण दिलं आहे. या जोडप्याला पोझ सांगताना बोटचालकाचे हावभाव, त्याची स्टाईल, त्याची सांगण्याची पद्धत पाहून तुम्हीही त्याचे कौतुक कराल एवढं नक्की.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ भारतीय रेल्वे लेखा सेवा (IRAS) अधिकारी अनंत रुपनागुडी यांनी पहिला आणि त्यांच्या अधिकृत @Ananth_IRAS एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे. ‘इतके प्री-वेडिंग शूट बघून बोटचालकही झाला दिग्दर्शक!’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी पोट धरून हसत आहेत. तर काही जण बोटचालकाचे कौतुकदेखील करत आहेत. जोडपं फोटोशूट करीत असलेलं ठिकाण आंध्र प्रदेशातील प्री-वेडिंग करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे; त्यामुळे बोटचालकाससुद्धा फोटोशूटसाठी कोणत्या पोझ द्यायच्या हे अगदी चोख लक्षात आहे.