Viral video: ‘ऐकावं जनाचं करावं मनाचं’ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. घरातली जेष्ठ मंडळी तर हे वाक्य सारखं बोलून दाखवतात. म्हणजे सर्वांचं ऐका पण तुमच्या मनाला पटेल तेच करा. पण तरी देखील काही मंडळी मित्र-मंडळींच्या नादाला लागतात अन् नको ते करून बसतात. मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील असाच एक गंमतीशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल काय गरज होती का मित्रांच्या नादाला लागायची. सध्या प्रपोज करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

हा व्हिडीओ मुंबईतील मरीन ड्राईव्हवरचा असून, याठिकाणी एका तरुणाला चांगलाच चोप मिळालाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मरीन ड्राईव्हवर दोन तरुणी जाताना दिसत आहेत. यावेळी समोरुन दोन तरुण येतात आमि त्यातील एक तरुण समोरुन येणाऱ्या तरुणीला गुलाब देऊन प्रपोज करतो. मात्र त्यानंतर घडलं भलतंच. त्या तरुणीनं चक्क त्या तरुणाच्या कानाखाली लगावली, तसंच चपलेनेही मारायला निघाली होती. यावेळी या तरुणाची अवस्था घाबरून खराब झाली. तिथे उपस्थित कॉलेज तरुणींनी हा प्रकार कॅमेरात कैद झाला असून आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “लग्न ठरेपर्यंत कुणीही घराबाहेर आलात तर…” भर चौकात तरुणानं ग्रामस्थांना दिली धमकी; VIDEO पाहून व्हाल लोटपोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसंच हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत, ज्या पाहिल्यानंतर तुम्हीही स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाही. एका यूजरने लिहिले आहे की, त्याला मोठा हिरो बनण्याची आवड होती, आता खूप मजा आली असेल. याशिवाय अनेकांनी विचित्र कमेंट्स केल्या आहेत. हा प्रोपोज त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील असे एका यूजरने लिहिले आहे.अशा गंमतीशीर प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या जात आहेत.