scorecardresearch

महाराष्ट्राची पोरं हुशार! ६ हजार मीटरवर फडकवला तिरंगा; डोंबिवलीतील दोघांसह पुणे, कर्जतच्या तरुणांचाही समावेश

११ गिर्यारोहकांनी मिळून हिमाचलमधील पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या ६ हजार १०५ मीटर उंचीवरील शिखर सर करून तिथं तिरंगा फडकावण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

महाराष्ट्राची पोरं हुशार! ६ हजार मीटरवर फडकवला तिरंगा; डोंबिवलीतील दोघांसह पुणे, कर्जतच्या तरुणांचाही समावेश
या तुकडीने २८ जुलै रोजी जिंगजिंगवार बेस कॅम्पपासून प्रवास सुरु केला.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ११ गिर्यारोहकांनी मिळून हिमाचलमधील पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या ६ हजार १०५ मीटर उंचीवरील शिखर सर करून तिथं तिरंगा फडकावण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या तुकडीमधील चार गिर्यारोहक हे महाराष्ट्रातील आहेत. हिमाचल आणि लडाखच्या सीमेवर असलेलं हे शिखर सर करण्यासाठी गेलेल्या तुकडीचे नेतृत्व मध्य प्रदेशमधील आयकार विभागाचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत सिंह यांनी केले. वेगवेगळ्या राज्यातील ११ गिर्यारोहकांच्या या तुकडीने २८ जुलै रोजी जिंगजिंगवार बेस कॅम्पपासून प्रवास सुरु केला.

नऊ दिवसांच्या मोहीमेनंतर ही तुकडी ५ ऑगस्टला केलॉन्ग येथे पोहोचली. यावेळी या तुकडसोबत एक दुर्दैवी घटना घडली. १ ऑगस्टला हा संघ ५१०० मीटर उंचीवर पोहोचताच मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव सुरु झाल्यामुळे त्यांना तब्बल दोन दिवसांसाठी आपला प्रवास थांबवावा लागला. यावेळी त्यांचे कपडे, बॅग्स, इतर आवश्यक सामान पूर्णपणे भिजले. अशा परिस्थितीत त्यांना त्या थंड ठिकाणी दोन दिवस काढावे लागले. इतकंच नाही तर या मोहिमेदरम्यान या तुकडीला हिमनदीवरुन पायी चालत जावं लागलं. विशेष म्हणजे हा प्रवास थोडाफार नव्हता तर तब्बल अडीच किलोमीटरपर्यंत होता.

चिमुकल्याने गायलेलं गोंडस राष्ट्रगान ऐकून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध; हा Viral Video एकदा पाहाच

बर्फवृष्टीमध्ये या शिखरावर चढाई करणे सोपे नव्हते. मात्र बर्फाळ वाऱ्यासह कडाक्याच्या थंडीतही या गटाने चार ऑगस्टला शिखर सर करून त्यावर तिरंगा फडकावला. या तुकडीत डोंबिवलीचे ओमकार जोशी आणि तनय नहाते या दोघांचा समावेश होता. तर पुण्याचा अभिषेक गायकवाड आणि कर्जतचा सिदेश कदम ही आणखी दोन मराठमोळी मुलंही या मोहिमेमध्ये सहभागी झाली होती. काही महिला गिर्यारोहकही या तुकडीमध्ये होत्या हे विशेष.

“अरे बहुत जगह हैं”चं फीमेल व्हर्जन सोशल मीडियावर होतंय व्हायरल; Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

या यशस्वी मोहिमेनंतर, या तुकडीमधील काही सदस्य ८५८६ मीटर उंचीचे माउंट कांचनजंगा, जगातील तिसरे सर्वोच्च आणि भारतातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे नियोजन करत आहेत. तर, ८८४८ मीटर उंचीचे जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची इच्छा या तुकडीमधील काही सदस्यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.