Bride Dinosaur Entry Viral Video: कोणत्याही व्यक्तीसाठी लग्नाचा क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो. लग्नामध्ये प्रत्येक नवरी पारंपारिक पोशाख परिधान करून शृंगार करते. नवरीच्या रुपात होणाऱ्या पत्नीला पाहून नवरदेवाच्या डोळ्यात पाणी येते. पण आज काल लोकांना काहीतरी हटके हवे असते. सोशल मीडियावर अनेकदा हटके पद्धतीने लग्न करणार्‍यांचे व्हिडिओ व्हायरल होतात अशाच एका व्हिडीओची सध्या चर्चात होत आहे.

व्हायरल व्हिडिओ एक हळदी संमारंभातील आहे जेव्हा नवरी चक्क डायनासोरच्या पोशाखात एन्ट्री घेते. नवरीला हा विचित्र पोशाखात पाहून नवरदेवाला धक्काच बसतो. पण तो आपल्या नवरीचे उत्साहाने स्वागत करतो. डायनासोरच्या पोशाखातच नवरी नवरदेवाबरोबर डान्स करते हे पाहून सर्वजण थक्क होतात. नवरीची हटके एन्ट्री पाहून नवरदेवच काय सर्वच जण चक्रावतात.

डायनासोरच्या पोशाखात नवरीची एन्ट्री

इंस्टाग्राम वापरकर्ता मलकीत शेरगिलने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये लिहिले आहे, “कधी असे काही पाहिले आहे का?” व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, डायनासोरच्या पोशाखात नवरीला पाहून लोक सुरुवातीला थक्क होतात. पण, नंतर नवरदेव तिच्याकडे जातो आणि तिला मिठी मारतो. , डायनासोरच्या पोशाखात नवरी नवरदेवाबरोबर नाचते. हे सर्व जण नातेवाईक थक्क होऊ पाहत असतात.

आतापर्यंत ३० लाखांहून अधिक वेळा पाहिलेल्या या व्हिडिओवर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून विविध प्रतिक्रिया देत आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “मी संपूर्ण आठवड्यात पाहिलेली ही सर्वात मजेदार गोष्ट आहे, त्याने कशी मजा केली हे मला खूप आवडले!” दुसऱ्याने म्हटले: “मी हसू आवरत नाही, लग्नाच्या ताणातून मुक्त होण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.” काहींनी उपाहात्मक टिका करत म्हटले की, लग्नाच्या आधीच खरे रूप दाखवले.

अनेकांनी नवरीच्या सर्जनशीलतेचे आणि गंमतीचे कौतुक केले, एका वापरकर्त्याने कमेंट केली की, “हे असे लग्न आहे ज्याचा आपण सर्वजण भाग बनू इच्छितो! तुमच्या खास दिवशी वेगळे दिसण्याचा हा किती उत्तम मार्ग आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काहींनी नवरदेवाच्या प्रतिक्रियेची खिल्ली उडवली, एका वापरकर्त्याने लिहिले, “नवरदेवाचे हावभाव सर्व काही सांगून जातात, तो प्रत्येक क्षण प्रेमळ आहे!” दुसऱ्याने जोडले: “नवरदेवाला असे वाटत होते की, तो त्यासाठी तयार नव्हता पण त्याला ते खूप आवडले!”