प्रत्येक व्यक्तीसाठी आपले घर फारच खास असते. अनेक परिश्रम करून त्याने ते उभारलेले असते. माणूस जगात कुठेही गेला तरीही त्याला त्याचे घर प्रिय असते. पण कल्पना करा, जर तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरी पोहोचलात आणि तिथे तुमचे घरच नसेल तर? तुम्हाला असं वाटेल की तुमच्याकडे आता काहीच उरलं नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजातही धस्स होईल.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की कशी एक पाच माजली इमारत केवळ ३ सेकंदांमध्ये जमीनदोस्त होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचं काय झालं असेल हा विचार आपण करूच शकत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील नक्कीच निराश झाला असाल.

या Viral Photo मध्ये लपलेली मुलगी शोधणे इतके सोपे नाही; तुम्हीही करून पाहा प्रयत्न

‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ! शेंगदाणे विकणारा व्यक्ती रातोरात बनला स्टार

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की ही पाच माजली इमारत आधी तिरकी झाली आणि बघता बघता कोसळली. एक लहानसे घरही या इमारतीच्या कोसळण्याने जमीनदोस्त होते. हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वीचा असून तो हिमाचल प्रदेशचा असल्याचा सांगण्यात येतोय. अहवालानुसार, मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे ही इमारत एका झटक्यात कोसळली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पावसाळ्याच्या दिवसात अशी अनेक दृश्ये पाहायला मिळतात. कधी दरड कोसळून घरांचे नुकसान होते तर कधी रस्ते तुटतात. हा व्हिडीओ theournaturee नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ४० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला ३५ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.