scorecardresearch

अपघातात गाडीचा झाला चुरा, पण ड्रायव्हरला आला नाही एकही ओरखडा; Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

या अपघातात कारचा चुरा झाला, मात्र गाडी चालवणाऱ्या चालकाला एक ओरखडाही आला नाही. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

car-had-a-dangerous-accident-but-the-driver-was-not-even-scratched
नेटिझन्स या व्हिडीओवर जोरदार कमेंट करत आहेत. (Photo : Instagram/@meemlogy)

‘जाको राखे सैयां मार सके ना कोई’ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही म्हण खऱ्या अर्थाने साकार झालेली दिसते. व्हिडीओमध्ये एक कार ट्रकला धडकताना दिसत आहे. या अपघातात कारचा चुरा झाला, मात्र गाडी चालवणाऱ्या चालकाला एक ओरखडाही आला नाही. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या भीषण अपघाताचा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल की, ‘यमराज आज रजेवर गेल्याचे दिसत आहे.’ या संपूर्ण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इतका भयानक आहे की त्याला आतापर्यंत जवळपास एक कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. कार आपल्या लेनमध्ये धावत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यादरम्यान समोरून येणाऱ्या वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.

ऐकावं ते नवलंच; कोंबड्याच्या हत्येवर रडले संपूर्ण गाव, दोषी पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध केली शिक्षेची मागणी

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

ही टक्कर खूपच खतरनाक होती हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. या टक्करमुळे कारचा पुढील भाग उडून गेला आणि गाडीचे संपूर्ण इंजिन सुद्धा चक्काचूर झाले. चालक बसलेल्या जागेच्या आजूबाजूच्या भागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, व्हिडीओतील आश्‍चर्यकारक बाब म्हणजे ड्रायव्हरला साधा ओरखडाही आला नाही.

एवढ्या धोकादायक अपघातानंतरही चालक सीटवर आरामात बसलेला दिसतो. इन्स्टाग्रामवरील meemlogy पेजवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. इथून हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर झाला. नेटिझन्स या व्हिडीओवर जोरदार कमेंट करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The car was wrecked in the accident but the driver did not get a single scratch you too will be shocked to see the viral video pvp

ताज्या बातम्या