अनेकदा लोक रस्त्यावरून चालताना किंवा पायऱ्या चढताना आणि उतरताना घसरतात आणि पडतात. अचानक घडलेल्या या घटना अनेक वेळा कॅमेऱ्यात कैद होत नाहीत. पण यावेळी एक घटना व्हीडीओमध्ये कैद झाली. सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक व्हिडीओ चर्चेत आहे. मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला बर्फावर घसरताना आणि पडण्यापासून वाचायचा प्रयत्न करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय झालं?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका हवामान पत्रकाराचा आहे. रिपोर्टिंग करत असताना एक महिला तिच्या मागे पडताना दिसत आहे. एबी वे नावाच्या या रिपोर्टरला लोक चांगले ओळखतात. तिच्या नुकत्याच झालेल्या व्हिडीओमध्ये, एक महिला तिच्या मागून पायऱ्या उतरत असताना धडपडत असतांना दिसत आहे. यामुळे प्रेक्षकांचं लक्ष रिपोर्टरपेक्षा तिच्या पाठी घडत असलेल्या घडामोडीकडेच जात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.

(हे ही वाचा: एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी; ड्रायव्हरचा यू-टर्न घेतानाचा Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

ट्विटरवर शेअर केला गेलेला हा व्हिडीओ नेटीझन्सना खूप आवडला आहे. हा व्हिडीओ १० खांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. काही लोकांना हा व्हिडीओ इतका मजेदार वाटला की त्यांनी त्यावर मीम्सही बनवले.

(हे ही वाचा: आठ वर्ष… आठ पगडी.. पाहा २०१५ पासून २०२२ पर्यंतचे पंतप्रधान मोदींचे Republic Days Special Looks)

(हे ही वाचा: Viral Video: स्वर्गासारखे हे सुंदर दृश्य पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!)

या व्हिडीओबद्दल अनेकांची मते भिन्न असली तरी ही वापरकर्त्यांनी या व्हिडिओच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि हा पूर्वनियोजित आणि शूट केल्याचा आरोप केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The funny scene behind the reporter was captured on camera while reporting the weather report live ttg
First published on: 26-01-2022 at 13:51 IST