दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो आहे. एकमेकांना घरी बनवलेला फराळ देणं, दारात रोज नवनवीन रांगोळी काढणं, कंदील व पणत्या लावणं अशा अनेक गोष्टी आनंदानं केल्या जातात. दिवाळीत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच फटाके फोडण्यास उत्सुक असतात. मात्र, फटाके फोडण्यात जितकी मजा असते तितकीच ती स्वतःसाठी आणि इतरांसाठी घातकही असते. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एका तरुणीला फटाके फोडणं चांगलंच महागात पडलेलं दिसून येत आहे.

व्हायरल व्हिडीओत एक तरुणी फटाके फोडण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. फटाके नेहमीच जमिनीवर ठेवून फोडले जातात; पण ही तरुणी जमिनीवर फटाका न ठेवता, अगरबत्ती घेऊन हातात फटाके फोडताना दिसते आहे. तरुणी हातातल्या फटक्याला अगरबत्ती लावायला जाते तितक्यात मागे जमिनीवर पडलेला एक फटाका अचानक पेट घेतो आणि फुटतो. हे कळताच तरुणी घाबरते आणि जोरात ओरडून इकडे तिकडे पळण्यास सुरुवात करते. व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIDEO : रीलसाठी काहीपण! तरुणाने चक्क पॅंटमध्ये लावला फटाखा, पेटताच गोल गोल फिरु लागला अन्…

व्हिडीओ नक्की बघा :

अनेक तरुणी मंडळी, लहान मुलं विचित्र पद्धतीनं फटाके फोडतात. रहदारीच्या रस्त्यावर कोणी ये-जा करीत आहे का हे न बघता फटाके फोडले जातात. काही जण हातात फटाका पेटवून लांब फेकून देतात; तर काही जण हातातच फटाका फोडतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतसुद्धा असंच पाहायला मिळालं. तरुणी हातात घेऊन फटाके फोडायला जाते; पण आधीच जमिनीवर असणारा फटाका अचानक पेट घेतो आणि फुटतो. तरुणी घाबरून जाते आणि आरडाओरडा करून इकडे-तिकडे पळण्यास सुरुवात करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा असं होतं की, आपण फटाके पेटवतो; पण ते त्यावेळी न फुटता, अगदी उशिरा फुटतात. या व्हिडीओतील तरुणीसोबतसुद्धा असंच घडलं. तरुणी फटाके फोडायला जाते आणि जमिनीवरचा एक फटाका अचानक पेट घेतो. त्यामुळे ती तरुणी घाबरते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @iamsatyamakeshari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया देताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.