जगात अशी बरीच लोक आहेत जी पैशांनी श्रीमंत मानली जातात. तर काही लोक ज्ञानाने श्रीमंत असतात. त्याचप्रमाणे काही लोक अशीही असतात, ज्यांच्यामध्ये कलेची श्रीमंती असते. त्यांच्यात दडलेली कला बघून सारे जग थक्क होते. विशेषत: जर आपण चित्रकलेबद्दल बोललो तर जगात लाखो लोक असतील जे पेंटिंग करत असतील, परंतु त्यापैकी काही मोजकेच असतात ज्यांचे चित्र हृदयस्पर्शी असते.

तसंच आजकाल थ्रीडी पेंटिंगही खूप पाहायला मिळत आहे. थ्रीडी पेंटिंग बनवणं अजिबात सोपं नसतं, पण बनवल्यानंतर ते पूर्णत: खरं असल्याचं जाणवतं. आजकाल या 3D पेंटिंगशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे , जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस झाडावर सुंदर थ्रीडी पेंटिंग बनवताना दिसत आहे. तो एका मुलीचे चित्र काढतो जी इतकी सुंदर दिसते की लोक गोंधळून जातात.

( हे ही वाचा: वडिलांच्या अपघातानंतर ७ वर्षांचा मुलगा झाला झोमॅटो डिलिव्हरी बॉय, रात्री ११ वाजेपर्यंत सायकलवरुन करतो काम)

त्या व्यक्तीची अप्रतिम कलाकृती पहा

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कलाकाराने झाडावर कागद किंवा प्लास्टिक गुंडाळले आहे आणि वेगवेगळ्या रंगांचा वापर करून तो एका मुलीचे चित्र काढत आहे. सुरुवातीला तो एवढं सुंदर चित्र काढू शकेल असं वाटत नाही, पण हळूहळू जेव्हा तो संपूर्ण पेंटिंग बनवतो त्यानंतर डोळ्यांवर विश्वास बसू लागतो. तेव्हा ते चित्र पाहण्यासारखे आहे. हे पेंटिंग पाहिल्यावर असे वाटते की, जणू झाड मधूनच कापले गेले आहे आणि त्यामध्ये एक मुलगी उभी आहे. अशी कला प्रत्येकाला जमतेच असे नाही.

( हे ही वाचा: Viral Video : हरिद्वारमधील हर की पौरी घाटावर गंगा नदीत माणसाने फडकावला तिरंगा, पाहा व्हिडीओ)

( हे ही वाचा: जागरणमध्ये ढोल वाजवणार्‍या एका व्यक्तीने जिंकले लाखो लोकांचे मन, जस्टिन बीबरही झाला फॅन, पहा Viral Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सुंदर थ्रीडी पेंटिंगचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ केवळ ३७ सेकंदांचा असून आतापर्यंत जवळपास १३ हजार वेळा पाहिला गेला आहे, तर कलाकाराची अप्रतिम कलाकृती पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रत्येकजण त्या व्यक्तीचे कौतुक करत आहे.