The Naked Gardener : झाडांना पाणी देण्याचे काम प्रत्येक निसर्ग प्रेमी आनंदाने करतात पण एक महिला अशी आहे, जी रोज टॉपलेस होते आणि मग झाडांना पाणी देते. हे सर्व ऐकून तुम्हाला कितीही विचित्र वाटत असले तरी हे सत्य आहे. ही महिला युट्युब आणि इन्स्टाग्रामवर द नेक्ड गार्डनर' (The Naked Gardener) नावाने प्रसिद्ध आहे. ही महिला झाडांची काळजी घेताना रोज सकाळी त्यांना पाणी देते. ती आपल्या बागकामासंबधीत व्हिडिओ आपल्या फॉलोअर्स सोबत शेअर करत असते. तिच्या व्हिडिओ पाहून लोक नेहमी एकच प्रश्न विचारतात की टॉप लेस होऊन झाडांना पाणी देण्यामागचे कारण काय आहे? हे सर्व पब्लिसिटी स्टंट म्हणून करते की आणखी फॉलोअर्ससाठी असे करते? ही महिला करते टॉपलेस गार्डनिंग लोकांच्या या प्रश्नांना उत्तर देताना या महिलेने एका व्हिडिओमध्ये सांगितले की'' टॉपलेस होऊन झाडांना पाणी देणे हा तिचा पब्लिसिटी स्टंट आजिबात नाही. हे सर्व ती निर्सगाच्या राहण्यासाठी करते.'' या महिलेने सांगितले '' मी जेव्हा टॉपलेस असते तेव्हा सुर्याची किरणे थेट माझ्या त्वचेवर पडतात. हवा माझ्या शरीराच्या आतपर्यंत पोहचते. हे सर्व मला निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जाते.'' ''प्रत्येकाला गार्डनिंग करताना असे टॉपलेस व्हायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही निसर्गाशी जोडले जाऊ शकता.'' असेही या महिलेने सांगितले. हेही वाचा - भारतातील सर्वात सुंदर गावांचे फोटो पाहिले का! आनंद महिंद्रांनी शेअर केली त्यांची Bucket list, तुम्हीदेखील देऊ शकता भेट या कारणासाठी करते टॉपलेस गार्डनिंग यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये तिने लिहिले, 'मी गेल्या दोन वर्षापासून होमस्टेड आणि फूड फोरेस्ट पर्माकल गार्डन तयार करत आहे. मी कोणतेही रसायनिक गोष्ट वापरत नाही. मी माझ्या शरीराला सुर्यप्रकाश देते, जमीन आणि हवेचा स्पर्श जाणवू देते. त्यामुळे मला खूप चांगले वाटते. हेही वाचा - ‘हीच खरी माणूसकी!’ तारेमध्ये अडकलं घुबड, ‘असा’ वाचवला त्याचा जीव! पाहा अंगावर काटा आणणार Video लोक म्हणे हा तर पब्लिसिटी स्टंट ही महिला भलेही टॉपलेस होऊन गार्डनिंग करत असेल पण काही यूजर्स असे गार्डनिंग करणे चुकीचे मानतात आणि हे सर्व एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे मानतात. महिलेने युट्यूबवर २ लाखपेक्षा जास्त सब्सक्राइबर आहेत. ती नेहमी आपल्या गार्डनिंगसंबधीत व्हिडिओ येथे पोस्ट करत असते.