scorecardresearch

आली लहर केला कहर! प्रेयसीला तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीच केलं प्रपोज; पहा पुढे काय झालं

लोक एखाद्याला प्रपोज करण्यासाठी खूप छान योजना आखतात आणि आपल्या पार्टनरला चकित करण्यासाठी काहीतरी करतात, परंतु या व्यक्तीने प्रपोज करण्यासाठी नक्कीच चुकीची वेळ निवडली.

The proposal was made to the beloved at the time of her father funeral
दक्षिण आफ्रिकेतील एका धर्मगुरूने आपल्या प्रेयसीला तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीच प्रपोज केले. (Photo : Youtube/ 6IX WORLD NEWS)

कधीकधी लोक त्यांच्या लव्ह लाइफबद्दल इतके उत्साहित होतात की ते आजूबाजूच्या परिस्थितीचा विचारही न करता विचित्र गोष्टी करतात. सध्या अशीच काहीशी गोष्ट घडली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोणत्याही अंत्ययात्रेत उदास वातावरण असते. अशावेळी मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी लोक प्रार्थना करतात. मात्र, सध्या एक असे प्रकरण समोर आले आहे, जिथे अंत्यसंस्काराच्या वेळी एका मुलाने मृत व्यक्तीच्या मुलीलाच सर्वांसमोर गुडघे टेकून प्रपोज केले. यादरम्यान त्याची प्रेयसी रडत होती, मुलाला मात्र इतर काहीच दिसत नव्हते.

लोक एखाद्याला प्रपोज करण्यासाठी खूप छान योजना आखतात आणि आपल्या पार्टनरला चकित करण्यासाठी काहीतरी करतात, परंतु या व्यक्तीने प्रपोज करण्यासाठी नक्कीच चुकीची वेळ निवडली. दक्षिण आफ्रिकेतील एका धर्मगुरूने आपल्या प्रेयसीला तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीच प्रपोज केले.

एम मोजेलाने टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आपण या व्यक्तीला गुडघ्यावर बसतान पाहू शकतो. दक्षिण आफ्रिकेतील लिम्पोपो प्रांतात आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी रडणाऱ्या आपल्या प्रेयसीला या व्यक्तीने लग्नासाठी विचारले.

जगातील सातवा सर्वात महागडा हिरा घालून हॉलिवूड अभिनेत्रीची पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती; भारतीय संतापले कारण…

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

व्हिडीओ क्लिपच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘अंत्यसंस्काराच्या वेळी मृताच्या मुलीला प्रपोज केले आणि तिचे अश्रू पुसले.’ क्लिपमध्ये महिलेच्या वडिलांची शवपेटी दिसत आहे. या धर्मगुरूने प्रसंगाची परवा न करता आपल्या प्रेयसीच्या बोटात अंगठी घातली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, ‘हे चुकीचे आहे. आपण कोणत्याही प्रकारे त्याचे समर्थन करू शकत नाही. असे वाटते की त्याने तिला प्रपोज करण्यासाठी अंत्यसंस्काराची वाट पाहिली असावी. एवढ्या मोठ्या दुःखात असताना तुम्ही आनंदी कसे व्हाल.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The proposal was made to the beloved at the time of her father funeral see what happened next pvp

ताज्या बातम्या