आपल्याकडे अनेक प्राणी पळाले जातात. गाय, शेळी, मेंढी, कुत्रा, मांजर, पोपट असे अनेक प्राणी आपण कोणाच्या ना कोणाच्या घरात पाहतो. मात्र यापैकी कुत्रा हा असा प्राणी आहे जो माणसाचा सर्वात जवळ असून याला माणसाचा खरा मित्र म्हटले गेले आहे. बऱ्याच लोकांना कुत्रे पाळायला आवडतात आणि ते त्यांना कुटुंबातील सदस्य मानतात. इतकेच नव्हेतर काही लोक कुत्र्यांना आपली मुले मानतात. कुत्रा हा माणसापेक्षा जास्त इमानदार आणि मायाळू असतो.

दररोज सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यामध्ये अधिक व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ बघायला प्रचंड आवडतात. त्यातही जर हे व्हिडीओ कुत्र्याचे असतील, तर ते जास्त प्रमाणात बघितले जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक कुत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही कुत्र्यांना एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. या कुत्र्यांपैकी एक कुत्रा यावेळी तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात आहे.

Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

काम करावं तर असं! मुंबईच्या मुसळधार पावसातून ऑर्डर पोहचवण्यासाठी Swiggy डिलिव्हरी बॉयचा घोड्यावरून प्रवास

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की बऱ्याच कुत्र्यांना या पिंजऱ्यामध्ये एकत्रित ठेवण्यात आलंय. पण त्यातील एक लहानसा कुत्रा तेथून पळ काढण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी तो पिंजऱ्यावर चढत आहे. या कुत्र्याने एक छानसे टीशर्ट घातलेले आहे. सुरुवातीला आजूबाजूचे कुत्रे या लहानश्या कुत्र्याच्या कृतीकडे दुर्लक्ष करतात. पण नंतर जसजसा तो वर चढत जातो तसे इतर कुत्रेही एक एक करून पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात.

ऐकावं ते नवलंच! ‘या’ महापौराने चक्क मगरीशी बांधली लग्नगाठ; जाणून घ्या, काय आहे प्रकरण

हा मजेशीर व्हिडीओ @buitengebieden या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच, ‘आजपासून बंड सुरू झाले..’ असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १२.३ मिलिअनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून जवळपास ५ लाख लाइक्स मिळाले आहेत. तसेच ७१ हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.