देशभरातील विविध राज्यात शनिवारी पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रातील मुंबई-पुणे शहरातही हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातच्या अनेक भागात पाऊसाने हजेरी लावली होती. गुजरातच्या पाटनमध्ये मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे तेथील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पाटनमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यातील एका व्हिडीओत मुसळधार पावसामुळे एका शाळेत पाणी साचलं होते. तर शाळेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ट्रॅक्टरचा वापर केल्याचं या व्हिडीओत आहे. पावसामुळे शाळेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी तेथील लोक लोक ट्रॅक्टर घेऊन शाळेत पोहोचले. व्हिडीओत, एका शाळेच्या मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साजल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- जेट एअरवेजचे CEO भारतातील मेट्रो स्टेशनला म्हणाले ‘कलाहीन’; नेटकरी संतापले, म्हणाले “दुबईतच…”

हेही पाहा- उधळपट्टी स्वभाव नडला; एकेकाळी १०० कोटींची जिंकली होती लॉटरी, आता बिल भरण्याचेही वांदे…

मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुलांना तेथून बाहेर पडणं अवघड झालं होतं. त्यावेळी स्थानिक लोकांनी ट्र्रक्टरद्वारे मुलांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व मुलांना ट्रॅक्टरमध्ये बसलं आणि तेथून बाहेर काढण्यात आल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत तो १५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. शिवाय अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी गुरजात मॉडेल बेस्ट अशी कमेंट केली आहे. तर काहींना यावेळीचा उन्हाळाच स्कीप झाल्याचं म्हटलं आहे.

२४ तासांत मुसळधार पाऊस-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हवामान खात्याने (IMD) शनिवारी सांगितले की, पुढील काही दिवस देशाच्या विविध भागात पाऊस पडणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मेघालय आणि आसाममध्ये रविवारी मुसळधार पाऊस पडू शकतो. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हवामानतज्ज्ञ सोमा सेन रॉय म्हणाले की, येत्या २४ तासांत देशाच्या विविध भागात पाऊस पडेल. बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.