सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय बिबट्या,वाघ, सिंहासारखे हिंस्र प्राणी मानवी वस्तीत मुक्त संचार करून माणसांवर हल्ला करत असल्याच्या अनेक घटनाही उघडकीस येत असतात. रस्त्यावरून प्रवास करताना किंवा जंगलात भटकत असताना वन्य प्राण्यांनी माणसांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच जंगल सफारीसाठी गेलेल्या लोकांच्या अंगावर धावून गेलेल्या एका वाघाचा धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
खरं तर सततची जंगलतोड आणि लोकांनी जंगलांमध्ये केलेल्या अतिक्रमाणामुळे हे प्राणी मानवी वस्तीमध्ये घुसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही पर्यटक जंगल सफारीसाठी गेले असता, त्यांच्यावर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे. जंगलातील वाघ पर्यटकांच्या अंगावर धावून आल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये वाघाला पाहण्यासाठी गेलेले पर्यटक खूप घाबरल्याचंही दिसत आहे.
या थरारक घटनेचा व्हिडीओ @susantananda3 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये, जर प्रत्येक तासाला तुमच्या घरामध्ये कोणी घुसले तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर लोक सतत वाघांना पाहण्याच्या नावाखाली त्यांना त्रास देत असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत. शिवाय जंगल सफारीसाठी जाणाऱ्या लोकांचा वाघांना त्रास होत असल्यामुळे ते लोकांवर हल्ला करत असल्याचंही काही नेटकरी म्हणत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आतापर्यंत २२ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी वाघांच्या हक्काचं सरंक्षण व्हायला पाहिजे आणि त्यांना सतत त्रास देणं अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्यांने लिहिलं आहे, “तुम्ही माणसं आहात, तुम्हाला प्राण्यांपेक्षा जास्त समजते, मग तुम्ही असं का वागता? निदान इतरांची काळजी घ्यायला तरी शिका”