Viral video: वाघाला आपण जंगलाचा राजा म्हणतो. ज्याला पाहून किंबहुना त्याची फक्त डरकाळी ऐकून संपूर्ण जंगलातील सर्व प्राणी कसे थरथर कापतात, हे तुम्ही कधीतरी ऐकलंच असेल. जंगलातील हिंस्र प्राणी रहिवासी भागात शिरल्याच्या अनेक घटना घडतात. बिबट्या, वाघ, हत्ती, अस्वल…असे विविध प्राणी अनेकदा अन्न-पाण्याच्या शोधात रहिवासी भागात येतात. तुम्हीही अनेकदा अशा बातम्या ऐकल्या असतील. वाघ हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. तो जितका शक्तिशाली आहे तितकाच तो चपळ देखील आहे. रात्रीचा अंधार असो वा गडद झाडी वाघ कधीही कुठेही शिकार करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे वाघानं नुसती डरकाळी फोडली तरी देखील जंगलातले प्राणी भितीनं थरथर कापू लागतात. अशाच एका वाघानं एका चिमुकलीची शिकार करत सर्वांच्या डोळ्यादेखत तिला घेऊन गेलाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

वाघाची सर्वात जास्त ताकद जबड्यात असते. जबड्याचा उपयोग शिकार करणे, ओढून नेणे आदीसाठी करतो. मुलीचे डोके छोटे असल्याने वाघानं चिमुकलीचं डोकं थेट जबड्यात धरलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वाघानं चिमुकलीला अक्षरश: जबड्यात धरलं आहे आणि पुढे पुढे जंगलाच्या दिशेनं जात आहे. यावेळी आजूबाजूला लोक आहेत मात्र कुणीही चिमुकलीला वाचवण्यासाठी पुढे जाण्याची हिम्मत केलेली नाहीये. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, वन विभागाने तातडीने कारवाई करत बिबट्याला पकडण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mr_pushpa_358 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोकंही हळहळ व्यक्त करत वेगेवगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “जंगले नष्ट करणाऱ्या लोकांना तलवारीने कापा गोळ्या घाला….प्राणी आपली हद्द सोडत नाहीत.. माणसाने हद्द सोडली आणि जंगलात विकासाच्या नावाखाली घुसले….पण ह्यात स्थानिक लोकांना धोका निर्माण झाला आहे.” तर आणखी एकानं, “हिंसक प्राणी ते हिंसक असतात त्यांच्यावर दया दाखवणे म्हणजे आपल जीवन धोक्यात, म्हणून म्हणतो हिंसक प्राण्यावर जास्त दया दाखवायची नाही.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.