कोणताही ऋतू असो आपल्यातील अनेक जणांना अंघोळीसाठी गरम पाणी घेण्याची सवय असते. काही जण अंघोळीसाठी गॅसवर भांड ठेवून त्यात पाणी गरम करतात. तर सध्याच्या काळात गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी सगळ्यात जास्त गिझरचा उपयोग करण्यात येतो. तर, सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात पाणी गरम करण्यासाठी व्यक्तीने अगदीच हटके उपाय शोधून काढला आहे. युजरने तांब्याच्या पाईपचा उपयोग करून अनोख्या पद्धतीत पाणी गरम केलं आहे ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

पाणी गरम करण्यासाठी युजरने अगदीच हटके जुगाड केला आहे. नळाला तांब्याचा पाईप लावण्यात आला आहे. बाथरूममध्ये एक छोटा बर्नर ठेवून त्यावर हा तांब्याचा पाईप स्प्रिंगसारखा गोल फिरवून ठेवून दिला आहे. तसेच पाईपचा दुसरा भाग प्लास्टिकच्या टबमध्ये ठेवून दिला आहे. नळ चालू केल्यानंतर बर्नर द्वारे तांब्याच्या पाईपमधील पाणी गरम होऊन थेट टबमध्ये पडते. गिझरशिवाय पाणी गरम करण्याची युजरची हटके स्टाईल एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून नक्की बघा.

हेही वाचा…समुद्रकिनारी पोहण्याचा आनंद घेताना असे दृश्य दिसल्यास लगेच पाण्यातून बाहेर पळा अन्यथा…; पाहा Video

व्हिडीओ नक्की बघा :

व्यक्तीने बाथरूममध्ये एक सेटअप तयार करून घेतला आहे. तांब्याचा पाईप नळाला लावून त्याला प्लास्टिकच्या टबमध्ये ठेवून दिला आहे आणि मध्ये एक छोटा बर्नर ठेवला आहे आणि या बर्नरच्या मदतीने नळावाटे येणार पाणी गरम होऊन टबमध्ये पडताना दिसत आहे. तांब्याच्या पाईपचा उपयोग करून त्याने अगदीच खास पद्धतीत पाणी गरम करून घेतलं आहे ; जे आजवर कोणी पाहिलं नसेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @beaverart.engineer1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी याला ‘देसी गिझर’ बोलत आहेत आणि विविध शब्दात प्रशंसा करताना दिसत आहेत. तर काही जण यापेक्षा गॅसवर टोप ठेवून पाणी तापवलास असता तर बरं झाल असतं असे सुद्धा म्हणताना दिसत आहेत आणि सोशल मीडियावर हा अनोखा जुगाड अनेकांचं लक्ष वेधून घेतो आहे.