सोशल मीडियावर जशा वेगवेगळ्या बातम्या व्हायरल होत असतात तसेच डोके खाजवायला लावणारी अनेक कोडीही व्हायरल होतात. गेल्या काही दिवसांपासून असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जंगलाचा हा फोटो असून यात एक मानवी चेहरा लपला आहे आणि तो शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे.
Viral : ..म्हणून ‘या’ पायांनी सगळ्यांनाच संभ्रमात टाकले
सोशल मीडियावर एका जंगलाचा फोटो व्हायरल होत आहे. पानगळीचे जंगल आणि जमीनीवर पालापाचोळा पडला आहे. या फोटोमध्ये एक मानवी चेहरा देखील लपला आहे. तो चेहरा नेमका कुठे लपला आहे तो शोधण्याचा प्रयत्न सध्या सगळेच करत आहे. विशेष म्हणजे हा चेहरा फक्त १ मिनिटांत शोधून दाखवावा अशी स्पर्धाच सुरु आहे. जर हा चेहरा १ मिनिटांत शोधून दाखवला तर ती व्यक्ती अत्यंत हुषार आहे असेही फोटोपुढे लिहिले आहे. त्यामुळे बुद्धीचा प्रश्न म्हणून की काय अनेकांनी यातला चेहरा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्हाला जर १ मिनिटांत हा चेहरा सापडला नाही तर निराश होऊ नका कारण याचे उत्तर आम्ही दिले आहे. काही दिवसांपूर्वी समुद्रकिना-याचा एक फोटो ही व्हायरल झाला होता. या समुद्रकिना-यावर ६ घोडे लपले होते आणि ते घोडे शोधण्याची जणू स्पर्धा सुरू होती.