Viral Video : १९ फेब्रुवारीला देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात शिवप्रेमींनी साजरा केली. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम तर काही ठिकाणी ढोल ताशाचा गरज, काही ठिकाणी शिवरायांवर आधारित पोवाडे गीत गाऊन तर काही ठिकाणी शिवरायांचा जयघोष करत शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. अनेक शिवप्रेमींनी या दिवशी गड किल्ल्यांवर भेट दिली तर काही शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर आदरांजली वाहली. एवढंच काय तर सीमेवरही भारतीय सैन्य सुद्धा शिवजयंती साजरी करताना दिसून आले. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्य शिवजयंती साजरी करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक दिसेल. या स्मारकासमोर काही भारतीय सैन्य भगवा झेंडा घेऊन नृत्य करताना दिसत आहे. भारतीय सैन्य खूप सुंदर नृत्य सादर करताना दिसतात. बर्फाळ प्रदेशातील हा व्हिडीओ आहे पण या व्हिडीओमध्ये या ठिकाणाचे नाव सांगितलेले नाही. त्यामुळे हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, या विषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. या व्हिडीओवर पावनखिंड चित्रपटातील ‘श्वासात राजं ध्यासात राजं’ या गाणे लावलेले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “परिस्थिती कशीही असो रडायचं नाही, लढायचं हे राजांनी शिकवलं, आज पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडीओ. जय जिजाऊ, जय शिवराय”

हेही वाचा : VIDEO : “मटणाचा रस्सा केला वाटून घाटून..” महिलेनी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

iloovepune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यांच्यामुळे तर आज आपण येथे आरामात जीवन जगतो, जय हिंद जय शिवराय” तर एका युजरने लिहिलेय, “श्वासात राजं रं ध्यासात राजं, घावात राजं रं भावात राजं, जगण्यात राजं रं मरण्यात राजं हे शिवबा रं” आणखी एका युजरने लिहिलेय, “शिवबाचे खरे मावळे स्वर्गातून पुन्हा खाली उतरल्या सारखे झालं आहे”