फ्रेंड्स ग्रुपमध्ये कोणी बारीक असेल तर त्याला निश्चितपणे चिडवले जायचे. बारीक, कांडी, सुकड्या अशा अनेक नावांनी चिडवले जाते. याशिवाय अनेक टोमणे ऐकायला मिळतात. याशिवाय बाहेर वादळी वारा सुटला असेल किंवा वादळी पाऊस सुरु असेल त्यावेळी तरी काहीजण बारीक लोकांना भावा, घरात जा, वादळ तुला घेऊन जाईल असे मस्करीत चिडवले जाते. पण मस्करीत चिडवण्याच्या उद्देशाने बोललेल्या या गोष्टी जेव्हा खऱ्या आयुष्यात घडतात तेव्हा? ही गोष्ट तुम्हाला हास्यास्पद वाटेल, पण खरोखर एका मुलीबरोबर अशी घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका ठिकाणी जोरदार वादळ येत असल्याचे दिसून येत आहे. वादळाबरोबर पावसानेही कहर केला आहे. या वादळी पावसात लोकांना घराबाहेर पडू नये, असा इशारा हवामान खात्याकडून नेहमीप्रमाणे दिला जातो. पण काही लोक त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. ज्यानंतर या परिणाम भोगावे लागतात याचे उत्तम उदाहरण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर समजेल.
व्हिडीओमध्ये जोरात वादळी वारा वाहत आहे. वाऱ्याबरोबर पाऊस पडत आहे, रस्त्यावर दूरपर्यंत कोणीही दिसत नाही, एक वाहनही धावत नाहीत. अशा वादळी पावसात एक तरुणी घराबाहेर पडण्याचे धाडस करते, यावेळी तरुणी एका फूटपाथवरुन चालत येत असल्याचे दिसत आहे, तेवढ्यात अचानक सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होते. या वादळी वाऱ्यामुळे तरुणीचा तोल बिघडतो आणि ती वाऱ्याच्या वेगाने रस्त्याच्या मधोमध जाऊन पडते. वाऱ्याचा वेग इतका होता की तरुणीला काही समजण्याच्या आतच ती रस्त्यावर जाऊन पडते. या घटनेवेळी तिथे एक व्यक्ती देखील होता जो तिचा व्हिडीओ शूट करत होता.
हा व्हिडीओ पाहून खरचं बारीक लोकांनी एवढ्या वादळी पावसात घराबाहेर पडणे टाळले पाहिजे, हे विधान खरे ठरले आहे. केवळ बारीक लोकांनीच नाही तर ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनीही अशापरिस्थितीत घराबाहेर जाणे टाळावे, कारण अपघात कोणाचाही कधीही होऊ शकतो. त्यामुळे पावसाच्या दिवसात तरी काळजी घेतली पाहिजे.