Hidden Places in Goa : अथांग समुद्र, नारळ- फोपळीच्या बागा, टुमदार कौलारू घरे अशी निसर्गाची किमया असलेला गोवा अनेकांना भुरळ घालतो. यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण गोव्याला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. यात मित्र मैत्रिणींसोबत गोवा एन्जॉय करण्याची एक वेगळीच मज्जा असते. नारळांच्या बागांमध्ये रोमांचक नाईटलाइफचा आनंद घेता येतो. यामुळे गोवा नेहमीत पर्यटकांचे एक आवडते ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे.

पण गोव्यात असे अनेक Hidden Places आहेत, जे अनेकांना माहित नाहीत. त्यामुळे अनेकजण गोव्यातील फेमस आणि गर्दी असलेल्या ठिकाणांवर जातात. जिथे गोव्यातील शांत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद मिळत नाही. यामुळे आम्ही तुम्हाला गोव्यातील अशा काही Hidden Places बद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही गोव्याचा खरा आनंद घेऊ शकता.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
How To Made Homemade Crispy Potato Wafers
१ किलो बटाटे वापरून घरच्याघरी बनवा खमंग ‘बटाटा वेफर्स’; ३ वर्ष खराब होणार नाहीत
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम

चोरला घाट

गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले चोरला घाट हे एक सुंदर हिल स्टेशन आह, जिथून पश्चिम घाटाचे नेत्रदीपक दृश्य दिसते. इथे शहराच्या गजबजाटापासून दूर शांत आणि प्रसन्न वातावरणाचा आनंद घेता येतो, गोव्यातील हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. तुम्ही टेकड्यांवर ट्रेक करू शकता किंवा आराम करू शकता आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

सलौलीम धरण

दक्षिण गोव्यात स्थित सलौलीम धरण फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. हे ठिकाण पर्यटकांसाठी एक लोकप्रिय आकर्षण ठिकाण आहे. धरणाच्या आजूबाजूच्या टेकड्या आणि दऱ्यांमधील एक चित्तथरारक दृश्य पाहत आणि धरणाच्या शांत पाण्याचा निखळ घेण्यासाठी तुम्ही बोटीतून प्रवास करू शकता.

अर्वलेम धबधबा

संकेलिम या निसर्गरम्य गावात वसलेला अर्वलेम धबधबा हे गोव्यातील पर्यटनाचे उत्तम ठिकाण आहे. येथे धबधब्या मंत्रमुग्ध करणारे दृश्य पाहायला मिळते. हा धबधबा ५० मीटर उंचीवरून खाली कोसळतो ज्यामुळे एका नयनरम्य दृश्याचा आनंद घेता येतो. धबधब्याच्या सभोवतालचा परिसर हिरवळ आणि प्रसन्न वातावरण असलेले एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे.

नेत्रावली वन्यजीव अभयारण्य

नेत्रावली वन्यजीव अभयारण्य हे खूप कमी लोकांना माहिक असलेले एक अभयारण्य आहे जे एक अनोखा अनुभव देते. दक्षिण गोव्यात असलेले हे अभयारण्य विविध वनस्पती आणि प्राणी यांचे घर आहे. तुम्ही अभयारण्यातून ट्रेक करू शकता आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासात वाघ, बिबट्या आणि हत्ती यांसारखे प्राणी पाहू शकता.

एल्डोना गाव

उत्तर गोव्यात वसलेले, एल्डोना हे एक विलक्षण आणि मोहक गाव आहे जिथे गोव्याच्या पारंपारिक जीवनशैलीची झलक पाहायला मिळते. हे गाव सुंदर घरे, हिरवळ आणि शांत यासाठी ओळखले जाते. तुम्ही गावाभोवती फिरू शकता आणि स्थानिक बाजारपेठा, मंदिरे आणि चर्चला भेट देऊ शकता.

दिवार बेट

दिवार बेट हे गोव्यातील एक अद्वितीय अनुभव देणारे एक बेट आहे. मांडवी नदीत वसलेले हे बेट नैसर्गिक सौंदर्य आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखले जाते. तुम्ही बेटावर फेरीने जाऊ शकता आणि जुनी पोर्तुगीज घरे, चर्च आणि चॅपल एक्सप्लोर करू शकता.