सध्याचा भारतीय क्रिकेट संघ हा आपल्या खेळासोबत लूक्सवरही तितकाच भर देतो. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंह, अजिंक्य रहाणे यासारख्या खेळाडूंचं स्वतःचं स्टाईल स्टेटमेंट आहे. अनेक तरुण आज या खेळाडूंना फॉलो करतात. त्यातल्या त्यात विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. मात्र विराट कोहलीच्या लूक्सना टक्कर देणारा एक खेळाडू सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. गेल्या काही दिवसांत त्याच्या हटके स्टाईलमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताहेत.

हिमाचल प्रदेशकडून खेळणारा मयांक डागर सध्या आपल्या लूक्ससाठी चांगलाच चर्चेत आहे. मैदानात याने विराट कोहलीइतकी कामगिरी केली नसली, तरीही स्टाईल आणि लूक्सच्या बाबतीत हा खेळाडू आगामी काळात विराट कोहलीला नक्कीच टक्कर देऊ शकेल. आतापर्यंत मयांकने केवळ ८ प्रथमश्रेणी सामने खेळले असून, या सामन्यात त्याच्या नावे २८ बळी जमा आहेत. फलंदाजीमध्येही मयांकच्या नावे अवघ्या १२६ धावा जमा आहेत.

पहा मयांक डागरच्या या लूक्सची एक झलक –

https://www.instagram.com/p/BXPzWJKDpk5/

https://www.instagram.com/p/BXqIL6hjj3t

https://www.instagram.com/p/BYGR7DpjsqX/

https://www.instagram.com/p/BYgE4Zljnx7/

https://www.instagram.com/p/BYn7M9_jCxH/

https://www.instagram.com/p/BZgUQumjsCa/

https://www.instagram.com/p/BWkjUyOjg0r/