सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी वन्य प्राण्यांचे तर कधी पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ आपण रोज पाहतो. कधी कुत्र्या मांजराचे व्हिडीओ असतात तर कधी वन्य प्राण्यांच्या शिकारीचे. पण तुम्ही कधी कलाकार प्राण्यांचे व्हिडीओ पाहिले आहेत का? नसेल तर हा व्हिडीओ पाहा. सध्या सोशल मीडियावर एका चित्रकार हत्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. होय…तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. चक्क हत्ती चित्र काढत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये एक हत्ती त्याच्या सोंडेमध्ये ब्रश पकडून निसर्गाचे सुंदर चित्र काढत आहे. विशेष म्हणजे हत्तीने या चित्रातील डोंगर, आकाश झाड यांनी अगदी अचूक रंग दिले आहे. सुरावातीला तो आकाशाचा निळा रंग कागदावर ब्रशने रंगवतो. त्यानंतर गुलाबी रंगाची छटा आकाशाला देतो. त्यानंतर निळा, हिरवा आणि मातकट रंगाचे डोंगर काढतो. हिरव्या रंगाची जमीन काढतो. पांढर्या रंगाने झुळझुळ वाहणारी नदी काढतो. त्यानंतर एक सुंदर हिरव झाडही काढतो. हत्तीची ही कलाकारी पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

हेही वाचा – रात्रीच्या अंधारात जंगलात दुचाकीस्वाराच्या समोर आला सिंह अन्……; पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा

हेही वाचा – झाडू मारणाऱ्या महिलेच्या अंगावर अचानक पडली धान्यांची पोती, कामगारांनी वाचला जीव; थरारक घटनेचा Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांना चित्र काढणाऱ्या हत्तीचा व्हिडीओ फार आवडला आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर pawparadisedeals नावाच्या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओला ३२ हजार पेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे तर लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेक लोक व्हिडीओवर कमेंट करून हत्तीच्या कौशल्याचे कौतूक करत आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “क्षणभर थांब. त्या हत्ती फुलांनी बहरेलेल झाड काढले होते का? खरंच हे अप्रतिम आहे. ते ही त्याने आपल्या सोंडेने हे चित्र काढले होते.” दुसऱ्याने लिहिले की, “हत्ती नक्कीच हुशार आहेत…जर आपण संवाद साधू शकलो, तर मी त्यांना मानवतेच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करण्यास सांगेन.”
तिसऱ्याने लिहिले की, “हा हत्ती एक विलक्षण कलाकार आहे आणि हा सुंदर हत्ती लँडस्केप कलाकृती रेखाटत आहे.