धुम्रपानामुळे शरीराचे नुकसान होतात, त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ धूम्रपान न करण्याचा सल्ला देतात. परंतु तरीही अनेकांना धूम्रपानाचे व्यसन लागले आहे. सिगारेटची अनेक पाकिटे ओढत ते नंतर चेन स्मोकर बनतात. तुमचा विश्वास बसणार नाही की एक मादी चिंपांझी देखील आहे जी सिगारेट ओढायची. ती रोज १-२ नव्हे तर ४० सिगारेट ओढत असे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

का ओढत होती सिगारेट?

प्राणिसंग्रहालयात तिला लोकांच्या मनोरंजनासाठी सिगारेट ओढायला शिकवले गेले आणि नंतर हळूहळू तिला सिगारेटचे व्यसन जडले, तरीही या मादी चिंपांझीला पाहण्यासाठी खूप लोक येतात, त्यामुळे ती प्राणीसंग्रहालयात आकर्षणाचे केंद्र बनली होती.

(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)

ही चिंपांझी कुठे आहे?

सिगारेट ओढणाऱ्या मादी चिंपांझीचे नाव अझालिया असून तिला कोरियनमध्ये ‘डेल’ या नावाने संबोधले जाते. या चिंपांझीचे वय २५ वर्षे आहे, जो उत्तर कोरियातील प्योंगयांग प्राणीसंग्रहालयात आहे. प्राणीसंग्रहालयाला भेट देणाऱ्या लोकांमध्ये अझालिया खूप प्रसिद्ध आहे. ती दिवसाला ४० सिगारेट ओढत असे आणि कोणत्याही चेन स्मोकरप्रमाणे सिगारेटच्या स्मोक रिंग बनवत असे.

(हे ही वाचा:बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून ‘नाचू’ लागली महिला; लाइव्ह टीव्ही डिबेट दरम्यानचा Video Viral)

(फोटो: AP)

देण्यात आले होते प्रशिक्षण

अझलियाला असे प्रशिक्षण देण्यात आले की ती लायटरने सिगारेट पेटवायची आणि दुसऱ्या व्यक्तीने फेकलेल्या सिगारेटने सिगारेट पेटवायची. प्राणीसंग्रहालयात आलेल्या लोकांनी तिला सिगारेट ओढायला दिली तर ती सुद्धा प्यायची. ती खूप छान नृत्य करायची, ज्यामुळे लोकांचे मनोरंजन होत होते. त्यामुळे तिला प्राणीसंग्रहालयात पाहण्यासाठी लोक येत होते.

(हे ही वाचा: स्वत:ला आरशात पाहून घाबरून पळून गेला कुत्रा, मजेशीर video viral)

हत्ती, जिराफ पेक्षाही जास्त प्रसिद्ध

या प्राणीसंग्रहालयात हत्ती, जिराफ, पेंग्विन, गेंडा, उंट, गालागो, मासे, मगर, रॅटलस्नेक, कासव असे अनेक प्राणी आहेत, परंतु त्यापैकी ही चिंपांझी सर्वात प्रसिद्ध आहे. २०१६ मध्ये, कोरियन नेते किम जोंग-उन यांच्या आदेशानुसार प्राणीसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात आले, त्यानंतर अझालियाचे नाव प्रसिद्धीझोतात आले आणि ती प्राणीसंग्रहालयाची स्टार बनली.अझालियाशिवाय प्राणीसंग्रहालयात बास्केटबॉल खेळणारी माकडे, गाणी गाणारे पोपट, अॅबॅकस मोजणारे कुत्रेही आहेत. पण या सगळ्यांऐवजी सर्वाधिक गर्दी आजालियाकडे आकर्षित झाली आहे.

(हे ही वाचा: ‘आप’ला स्वॅगच वेगळा… पंजाबच्या CM उमेदवाराच्या घोषणेची फिल्मी स्टाइल पाहिलीत का?)

(हे ही वाचा: Viral Video: स्वर्गासारखे हे सुंदर दृश्य पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!)

तक्रार केल्यानंतर सोडण्यात आली सवय

पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्सचे अध्यक्ष इंग्रिड न्यूकिर्क यांच्या मते, मनोरंजनासाठी चिंपांझीला जाणूनबुजून धूम्रपान करणे चुकीचे आहे. तथापि, प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की मादी चिंपांझी धूर श्वास घेत नाही, ती बाहेर सोडते. स्वीडिश प्राणीसंग्रहालय तज्ञ जोनास वॉलस्ट्रॉम हे देखील असे म्हणतात की चिंपांझी धूम्रपान त्वरित थांबवावे. बर्‍याच तक्रारींनंतर, अझालियाची दिवसातून सुमारे ४० सिगारेट ओढण्याची सवय सोडण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This female chimpanzee was smoking 40 cigarettes a day was the center of attraction at the zoo ttg
First published on: 20-01-2022 at 14:02 IST