महिला, मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दिवसाढवळ्या रोड रोमिओ महिला, मुलींची छेड काढतात. या प्रकरणांमध्ये आधीही मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या आहेत. मात्र, तरीही यांची मस्ती कमी होताना दिसत नाही. दरम्यान, अशीच एक घटना गुजरातमधून समोर आली आहे, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तरुणीला, महिलेला रोड रोमिओची शिवीगाळ

हा व्हिडीओ गुजरातमधला असल्याचं बोललं जातं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण स्कूटीवरून जाताना रस्त्यावर दिसेल त्या तरुणीला आणि महिलांना शिवीगाळ करत आहे, त्यांच्या जवळून गाडी घेऊन जात आहे. यावेळी महिलाही घाबरत आहे. यामध्ये अपघात होण्याची किंंवा कुणी जखमी होण्याचीही शक्यता आहे, मात्र तरीही हा तरुण विनाहेल्मेट तरुणींची छेड काढत गाडी चालवत आहे. या रोड रोमिओचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरात पोलिसांनी याची दखल घेतली आणि तरुणाला चांगलीच अद्दल घडवली. पोलिसांनी अक्षरश: तरुणाची भर उन्हात त्याच रस्त्यावरून धिंड काढली आणि त्याला माफी मागायला सांगितली.

संतापजनक VIDEO व्हायरल

या व्हिडीओमध्ये घटनेची आधीची बाजू आणि नंतरची बाजू दाखवून अशा घटनांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातील असा संदेश एकप्रकारे यातून दिला आहे. आजकाल महिला दिवसाढवळ्याही सुरक्षित नाही. अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्या तर मुलींना घरातून बाहेर निघणे कठीण होईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! हा व्यक्ती स्वत:च्याच बोटांवर कोयत्याचे वार करतोय; VIDEO पाहून उडेल थरकाप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हालाही संताप आला असेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही या व्यक्तीच्या स्टंटवर संताप व्यक्त करत आहेत. व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत अशा लोकांवर कारवाईचीही काहींनी मागणी केली आहे. हा व्हिडीओ @gharkekalesh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्हूज आणि लाईक्स मिळत आहेत.