आजपर्यंत तुम्ही हातगाड्यावर किंवा रस्त्याच्याकडेला बसून भाजी विकणाऱ्या अनेक लोकांना पाहिलं असेल यात शंका नाही, पण तुम्ही कधी ऑडी कारमधून भाजी विकायला जाणाऱ्या व्यक्तीला पाहिले आहे का? कदाचित तुमचं उत्तर नाही असंच असू शकतं. पण सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. याचं कारण म्हणजे तो भाजी विकण्यासाठी चक्क ऑडीकारमधून गेल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या कडेला भाजी विकण्यासाठी ऑडी कारमधून आलेल्या या तरुण शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

केरळमधील तरुण शेतकरी सुजितने Variety Farmer’ नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो शेतातील पालकची भाजी कापताना दिसत आहे. शेतातील कापलेली भाजी तो विकण्यासाठी त्याच्या आलिशान कारमधून बाजारात घेऊन जात असल्याचे दिसत आहे. बाजारात पोहोचताच सुजीत आपल्या चपला काढतो आणि भाजी विक्रीसाठी ठेवतो. या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना सुजीतने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “ऑडी कारमधून गेलो आणि पालक भाजी विकली.” व्हिडिओ पोस्ट करताच तो तीन दिवसांत ६ मिनियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकरी या व्हिडिओला लाईक करत त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही पाहा- याला म्हणतात असली देशी जुगाड! पठ्ठ्याने कॅनपासून बनवला चक्क सॉकेट बोर्ड; Video झाला व्हायरल

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका इन्स्टाग्राम युजरने लिहिलं आहे, “माझी इच्छा आहे की सर्व भारतीय शेतकर्‍यांची अशी प्रगती व्हावी, ताज्या भाज्या पिकवा आणि विका.” दुसर्‍याने लिहिलं “तुम्ही काम करा, कष्ट आणि समर्पणाचे फळ मिळतेच.” सुजीतच्या इन्स्टाग्राम बायोनुसार, त्याने १० वर्षांपूर्वी शेती करायला सुरुवात केली होती. तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असून इन्स्टाग्रामवर त्याचे १९९ के पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो सतत शेतीशी संबंधित व्हिडीओ शेअर करत असतो.