Viral Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजनमध्ये आपले मन मोहित करण्याची क्षमता असते आणि वास्तवातील परिस्थितीबाबत आपल्या आकलनाला आव्हान देण्याचा हा एक आकर्षक मार्ग आहे. आपल्या मनाला संभ्रमात टाकणाऱ्या या फोटोंमध्ये आपण जे पाहतो आहोत ते सत्य आहे की वास्तव असा प्रश्न उपस्थितीत करण्याची क्षमता असते. प्रत्येक Optical Illusion असलेला फोटो पाहून आपण थक्क होतो. अलीकडे, इंटरनेटवर एक जुना ऑप्टिकल इल्यूजन पुन्हा चर्चेत आला आहे, जो लोकांना पुन्हा एकदा सर्वांना मोहित करतो. सावधान! हा ऑप्टीकल इल्यूजन असलेला फोटो पाहून तुम्हाला थोडी चक्कर येऊ शकते किंवा चक्कर आल्यासारखे वाटू शकते.

व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनमध्ये राखाडी चौरसांमध्ये हिरव्या रेषा दिसत आहे, या फोटो दिसणाऱ्या काही वक्र रेषा फक्त तुम्हाला शोधायच्या आहेत. काही लोक फोटो पाहून संभ्रमात पडत आहे तर काही लोक ऑप्टिकल इल्यूजनची कमाल पाहून पटकन डोळे मिटून घेतात. हा फोटो पाहून काही त्यांना फक्त सरळ रेषा दिसत असल्याचा दावा करत आहे. काही जण फोटोमध्ये दडलेलं कोड सोडविण्याच्या प्रयत्नात इतरांना काही ट्रिक्स सांगत आहेत जसे की फोटोवर फोकस करा किंवा डोळे बारीक करून पाहा.

हेही वाचा – तुम्हाला या फोटोत काही Message दिसतोय का हा मेसेज? नसेल तर जाणून घ्या सोपी युक्ती

लेखक स्टीव्ह स्टीवर्ट-विलियम्स यांनी आश्चर्यकारक इल्यूजनचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे आणि आपल्या नजरेला फसवण्याच्या ऑप्टिकल इल्यूजनच्या क्षमतेवर त्यांनी भाष्य केले आहे. पहिल्या नजरेत तुम्हाला या ऑफ्टिकल इल्यूजनमध्ये काही वक्र रेषा दिसतील. पण जेव्हा तुम्ही एखाद्या हिरव्या रेषेवर लक्ष केंद्रीत करता तेव्हा लक्षात येईल की, सर्व रेषा सरळ आहे. पण तरीही आपल्या डोळ्यांना वक्र रेषांना दिसत असल्याचा भ्रम होतो.

हेही वाचा – शोधाल तर सापडेल! ‘या’ फोटोत लपलंय एक लबाड मांजर, समोर असूनही दिसणार नाही, १० सेंकदाचं चॅलेज घ्या

शेअर केल्यापासून ऑप्टिकल इल्युजनने लक्षणीय लोकांचे लक्ष वेधले आहे. आतपर्यंत ५९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा फोटो पाहिला आहे. या ऑप्टिकल इल्यूजनवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काही व्यक्तींनी वक्र रेषा दिसत असल्याची कबुली दिली, हे एक “चांगले” ऑप्टीकल इल्यूजन आहे असे सांगितले आणि काहींनी फोटो पाहून गोंधळल्यासारखे आणि चक्कर आल्याचे कबूल केले.

तुम्हाला हा फोटो पाहून काय वाटले आम्हाला नक्की कळवा.