शहरी भागात सुविधा जास्त असतात. त्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा कमी असतात. मात्र, कमी सुविधा असूनही अनेक जण यशाला गवसणी घालतात. खेड्यातून शिक्षण घेऊन वर आलेल्या एका मुलानं आपल्या कर्तुत्वावर भारतात नाही तर सातासमुद्रापार आपली छाप उमटवली आहे. आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करत राम बोडके हे आज न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले आहेत. मराठी माणूस व्यावसाय करु शकत नाही असं आपण एकतो मात्र हेच खोट ठरवत आज राम बोडके हे न्यूयॉर्कमध्ये व्यावसाय करत आहेत. यशाच्या मोठ्या शिखरावर पोहचूनही मात्र ते आई-वडिलांना विसरले नाहीत. त्यांनी आई-वडिलांनाही न्यूयॉर्कमध्ये आणत त्यांचं जंगी स्वागत केलं तर आता काही दिवसांपूर्वी आणखी एक भन्नाट सरप्राईज त्यांना दिलंय. हे पाहून आई-वडिल फारच भारावून गेले तर त्यांच्या डोळ्यातही समाधनाचे भाव पाहायला मिळाले.

आई-वडिलांची स्वप्न पूर्ण केल्यानंतर जो आनंद आहे तो दिवस आयुष्यातला सर्वात मोठा दिवस असतो. हेच एका भारतीय तरुणानं न्यूयॉर्कमध्ये करुन दाखवलं आहे. या तरुणानं न्यूयॉर्कमधील बिल्डिंगच्या स्क्रीनवर आपल्या आई-वडिलांचे फोटो झलकवले आहेत. न्यूयॉर्कमधील बिल्डिंगच्या स्क्रीनवर झळकलेला आपला Video पाहून मराठमोळ्या आई-वडिलांची भावनिक’ प्रतिक्रिया नक्की पाहा. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मुलगा असावा तर असा अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

राम बोडके यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचे वडील प्रकाश बोडके आणि विमल बोडके यांचा हा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: मित्रांनी दिलेलं चॅलेंज स्विकारलं अन् भर मंडपातच झाली फजिती; नवरीला घेऊन नवरदेव स्टेजवरुन थेट खाली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्यासाठी उभं आयुष्य ज्यांनी कष्ट केले त्यांना चांगले दिवस दाखवण्याचं स्वप्न प्रत्येक मुलगा बघतो, यावेळी आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंदही खूप काही सांगून जातो.  हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या तरुणाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.