scorecardresearch

महिलेने एकाचवेळी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच मुलांना दिला जन्म; हॉस्पिटलमधील कर्मचारीही झाले हैराण

ब्रेंडा ही त्या दुर्मिळ मातांपैकी एक आहे ज्यांनी एकाच वेळी ५ मुलांना जन्म दिला. अशा प्रकरणांना क्विंटुप्लेट्स म्हणतात.

(Photo : Facebook/Raymundo Brenda)

लहान मुलांना देवाचा आशीर्वाद मानले जाते. प्रत्येक दाम्पत्याला मूल हे हवेच असते. अशीच एक इच्छा याही दाम्पत्याची होती. परंतु त्यांची ही इच्छा अशा पद्धतीने पूर्ण होईल हे त्यांना माहीतच नव्हते. टेक्सासची ब्रेंडा रेमुंडो केवळ २९ वर्षांची होती जेव्हा ती ५ मुलांची आई बनली. पण विशेष म्हणजे तिला गर्भधारणा फक्त एकदाच झाली. ब्रेंडा ही त्या दुर्मिळ मातांपैकी एक आहे ज्यांनी एकाच वेळी ५ मुलांना जन्म दिला. अशा प्रकरणांना क्विंटुप्लेट्स म्हणतात.

ब्रेंडा रेमुंडोला आई व्हायचं होतं पण त्यामध्ये काही अडचणी होत्या. त्यामुळे तिने फर्टिलिटी ट्रीटमेंट करून घेतली. यानंतर त्यांना ती आनंदाची बातमी मिळाली ज्याची ते कित्येक वर्ष वाट पाहत होते. मात्र त्यांना अशी बातमी मिळाली की ज्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले. ब्रेंडाने एकाच वेळी पाच मुलांना जन्म दिला. तिच्या डिलीव्हरीच्यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसाठीही ही गोष्ट हैराण करणारी होती. कारण अशी प्रकरणे फारच दुर्मिळ आहेत. पार्कलँड मेमोरियल हॉस्पिटलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त पाच क्विंटुप्लेट्सची नोंद झाली आहे जिथे ब्रेंडाची प्रसूती झाली आहे.

जगातील सातवा सर्वात महागडा हिरा घालून हॉलिवूड अभिनेत्रीची पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती; भारतीय संतापले कारण…

एकावेळी एकापेक्षा जास्त मुले जन्माला आल्याने अनेकदा मुले थोडी अशक्त होतात आणि इथे तर प्रकरण ५ मुलांचे होते. त्यामुळे, जन्मानंतर, सर्व मुलांना काही काळ इनक्यूबेटरमध्ये ठेवावे लागले. मूळतः मेक्सिकोचे रहिवासी असलेले ब्रेंडा आणि पती अलेजांद्रो इबारा त्यांच्या बाळांना पाहण्यासाठी आणि त्यांना दूध पाजण्यासाठी दररोज रुग्णालयात जात असत. त्यानंतर त्यांना एक एक करून घरी आणण्यात आले. गेल्या वर्षी १७ मे रोजी या सर्व मुलांचा जन्म झाला होता आणि ३० जुलैपर्यंत सर्व आपापल्या घरी पोहोचले. अशा परिस्थितीत आई-वडिलांची शारीरिक आणि आर्थिक स्थिती काय असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सुदैवाने, मुलांची आजी म्हणजेच ब्रेंडाची आई, मारिया अकोस्टा, त्यांना मदत करण्यासाठी उपस्थित होत्या. २ मुले ब्रेंडाच्या आईसोबत झोपायची तर इतर ३ मुले ब्रेंडा आणि तिच्या पतीसोबत झोपायची.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This woman gave birth to five children at once the hospital staff was also shocked pvp

ताज्या बातम्या