Viral video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी बिबट्या सुद्धा. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. एका वाघाने हरण, कोल्हा, झेब्रा नाही तर एका माकडाशीच पंगा घेतला. झाडावर चढण्याच पटाईत असणारा माकडाची शिकार करण्याचा वाघाचा डाव फसला अन् वाघ तोंडावरच आपटला.वाघाला धडा शिकवण्यासाठी माकडानं लढवलेली शक्कल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एरवी जंगलातील सर्व प्राणी ज्याला घबरतात अशा वाघाचा माकडाने चांगलाच गेम केला आहे. एरवी सगळ्या प्राण्यांना पळवणाऱ्या वाघालाच माकडाने सळो की पळो करुन सोडलं आहे. वाघ एका झाडावर चढतो आणि माकडाची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. पण माकडही जराही न डगमगता वाघाला खाली पाडण्यासाठी सापळा रचतो. माकड झाडावर उड्या मारून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. पण वाघाला झाडावर उड्या मारण काही जमत नाही. 

शेवटी वाघ दमतो आणि खाली बसतो मात्र माकड काही त्याला त्रास द्यायचं थांबवत नाही. माकड इकडून तिकडून येऊन कधी वाघाला मारतो तर कधी त्याची शेपटी पकडतो. हा गमतीशी व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> World Cup: क्रिकेटप्रेमींनो सावधान! वर्ल्ड कपच्या नावाखाली होतेय फसवणूक, तरुणीनं ५६ हजारांत घेतलं फायनलचं तिकिट, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघाच्या आणि माकडाच्या लढाईचा हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी स्माईली इमोजी सेंड करुन मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.