जर सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणतो तर वाघ सुद्धा काही कमी नाही. सिंहाप्रमाणेच वाघ सुद्धा खतरनाक शिकारी आहे. कितीही मोठा प्राणी असो वाघ एका फटक्यात त्याला फाडून टाकतो. तर दुसरीकडे सिंह सुद्धा वेळ प्रसंगी चित्त्याच्या वेगानं पळून शिकार करतो. पण विचार करा हे दोन खतरनाक शिकारी जर आपापसात भिडले तर काय होईल? दोघांमध्ये कोण बाजी मारेल? याचाच एक खतरनाक असा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
वाघ आणि सिंह हे जंगलातील सर्वात सामर्थ्यशाली आणि ताकदवान प्राणी आहेत. मात्र, अनेकदा या दोघांमध्ये अधिक सामर्थ्यवान कोण? किंवा जंगलाचा राजा कोण? असा प्रश्न अनेकांना पडतो. सोशल मीडियावर कधी सिंह तर कधी वाघाला जंगलाचा राजा म्हणून सांगितलं जातं. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, मात्र वाघाचेही जंगलात तेवढेच वर्चस्व असते. वाघ आणि सिंह यांची जंगलात आपली अशी एक दहशत असते. त्यामुळं फार क्वचितच वाघ आणि सिंह एकमेकांसमोर येतात. असाच एक वाघ-सिंहाच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कधी सिंह वाघावर तर कधी वाघ सिंहावर वरचढ ठरताना दिसत आहे. वाघ आणि सिंह यांच्यातील जबरदस्त लढाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
आपण बऱ्याचदा हे पाहातो की, मोठे शिकारी जसे की, वाघ, बिबट्या, सिंह इत्यादी आपलं पोट भरण्यासाठी जंगलातील प्राण्यांचा शिकार करतात. ते बऱ्याचदा शाकाहारी प्राण्यांची शिकार करतात. पण मांसाहारी प्राण्यांच्या वाट्याला ते कधीच जात नाही. मात्र व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह आणि वाघ एकमेकांसमोर उभा असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. दोघांनाही स्वत: चं मरण समोर दिसत आहे त्यामुळे दोघंही स्वत:चा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह काही पावलं मागे सरकतो आणि मग अचानक वाघावर जोरदार हल्ला करतो. सिंह वाघावर गर्जना करत हल्ला करतो आणि अखेर, दोघेही वेगवेगळ्या दिशेला निघून जातात. एकमेकांना हरवणं शक्य होणार नाही, हे बहुधा दोघांच्या लक्षात आलं असावं.
पाहा व्हिडीओ
दरम्यान मागील काही दिवसात प्राण्यांच्या लढाईचे अनेक विलक्षण व्हिडीओ समोर आले आहेत. कधी हत्तीवर सिंहीणीचा हल्ला, कधी झेब्र्याचा सिंहाशी लढा. हे व्हिडीओ पाहून जंगलातील थरार जवळून पाहण्याची संधी नेटकऱ्यांना मिळते.