सोशल मीडियामुळे अनेकांना ओळख मिळाली आहे. डान्स करताना व्हिडीओ पोस्ट करणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील पण आपल्या डान्स कौशल्याने लोकांच्या मनात स्थान मिळवणारे मोजकेच असतात. अशाच सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या दोन व्यक्तींचा अफलातून डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेय. मुंबईतील लोकप्रिय डान्सिंग कॉप अमोल कांबळे यांनी आपल्या डान्सने भारतीयांचे मन केव्हाच जिंकले आहे. आता जगभरातील लोकांचे मनही त्यांनी जिंकले आहे.

कांबळे यांनी जर्मन टिकटॉक सेन्सेशन नोएल रॉबिन्सनसह भन्नाट डान्स केला आहे. त्यांनी व्हिडिओसाठी इंदर आर्याचे लोकप्रिय उत्तराखंडी गाणे ‘गुलाबी शरारा’ निवडले आहे. .या व्हिडिओला ४.५दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या अनुभवाने रोमांचित झालेल्या रॉबिन्सन यांनी कांबळे यांना “जगातील सर्वात कूल पोलिस” म्हणून गौरवले.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Did Muslims Slaughter Cow For Rahul Gandhi Rally Why Crowd Tied Dead Cow
राहुल गांधीच्या रॅलीच्या स्वागतासाठी गायीची हत्या? लोकांनी जीपवर गायीचा मृतदेह का बांधला, भीषण सत्य वाचून हादरून जाल
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
The women danced to the pink saree song wearing Nauvari
याला म्हणतात मराठमोळा डान्स! नऊवारी नेसून गुलाबी साडी गाण्यावर महिलांनी धरला ठेका… Viral Video पाहून युजर्स करतायत कौतुक
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Video Mumbai’s dancing cop Amol Kamble dancing On Calm Down song With TikToker Noel Robinson German TikToker
VIDEO: खाकीतील डान्सर अमोल कांबळे अन् जर्मनी टिकटॉकरची जुगलबंदी; मुंबई पोलिसांचा ‘हा’ जबरदस्त डान्स तुम्ही पाहिलात का?
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
gaurav more and madhuri pawar dances on govinda song
Video : “किसी डिस्को में…”, गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर गौरव मोरेचा जबरदस्त डान्स, जोडीला होती ‘ही’ मराठी अभिनेत्री

नोएल रॉबिन्सन, ज्याला इंस्टाग्रामवर १०.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. लोकल ट्रेनपासून ते बाजारपेठांपर्यंत संपूर्ण शहरात त्याच्या उत्स्फूर्तपणे डान्स करण्यासाठी त्याला ओळखले जाते. नोएल रॉबिन्सन याने आपल्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांने मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांचा शोध घेत असताना कांबळे यांची भेट घेतली जे आधीपासून सोशल मीडियावर प्रसिद्धी आहे. दोघांनी गुलाबी शरारा गाण्यावर उत्तम डान्स कौशल्य दाखले आहे. रॉबिन्सनच्या बरोबरीने कांबळे यांनी डान्स केला आहे. प्रत्येक डान्स स्टेप अचूक पद्धतीने केली आहे. व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. लोकांना व्हिडीओ प्रचंड आवडला असून पुन्हा पुन्हा पाहत आहे.

हेही वाचा – “नजर हटी, दुर्घटना घटी!” रिव्हर्स घेताना थेट व्यक्तीच्या अंगावर घातली कार अन्….थरारक अपघात CCTVमध्ये कैद!

दोघांचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. बॉलीवूड स्टार अर्जुन कपूर, नेहा यू, सारा हुसैन आणि वैभव मलिक यांसारख्या इतर सेलिब्रिटींचे त्यांनी लक्ष वेधून घेतले. सर्वांनी टिप्पण्या आणि इमोजीसह त्यांचे कौतुक केले.

हेही वाचा – “सजा हैं काजल मेरी आखों में आज…”, जगभरात धुमाकूळ घालणारं ‘गुलाबी साडी’ गाण्याचं हिंदी व्हर्जन ऐकलं का? नसेल तर येथे ऐका

एका वापरकर्त्याने ” या पोलिसांला इतक्या डान्स स्टेप कशा काय लक्षात राहिल्या”

दुसऱ्याने लिहिले, “ते खूप मस्त आहेत”

तिसरा म्हणाला, “भारतीय पोलिसांसोबत नाचताय? हे नेक्स्ट लेव्हल होते!! तुम्ही उत्कृष्टपणे सादर केले.

चौथा म्हणाला, “पोलिस अधिकाऱ्याला सलाम”

पाचवा म्हणाला, “पोलिस अधिकारी चुकीच्या क्षेत्रात गेला, किती भन्नाट डान्स करतो आहे”