Summer Season Hacks : उन्हाळ्याच्या दिवसांत घरात प्रचंड उकडत असतं. त्यामुळे अनेकजण एसी, कुलरची मदत घेत घरात थंडाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. पण कितीही प्रयत्न केले तरी खिडक्या, गॅलरीमधून गरम हवा येतेच. यात जर चाळीत घरं असेल किंवा गावच्या घरांमध्ये कडक तापलेले पत्रे आणि कौलांमुळे प्रचंड गरम होत असते. अशा परिस्थितीतून वाचण्यासाठी एका व्यक्तीने एक भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. या जुगाडमुळे कौलारु घरात एसी, कुलरशिवाय थंडगार हवा मिळणार आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने घरात उष्णतेपासून वाचण्यासाठी एक अनोखा उपाय केला आहे. या व्यक्तीने आपल्या घराच्या छतावर पाण्याचे पाइप बसवलेत ज्यातून कारंज्याप्रमाणे पाणी येतेय. यामुळे पाणी पावसाच्या थेंबाप्रमाणे छतावर पडत आहेत.

त्यामुळे उन्हाने तापलेल्या कौलावरील उष्णता कमी होईल. या व्यक्तीचा जुगाड पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. त्या व्यक्तीने छताच्या सर्व बाजूने नीट पाणी पडण्यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे. उन्हापासून वाचण्यासाठी या व्यक्तीच्या युक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @adultsociety नावाच्या इन्स्टाग्रामवर पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरवर कमेंट करत लिहिले की, हे भारी आहे यार आहे, खूप गरमी आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे, इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. अशाप्रकारे अनेकांना हा जुगाड आवडला आहे. तर अनेकांनी हे म्हणजे पाण्याचा नासाडी प्रकार असल्याचे म्हटले आहे.