ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्याबद्दल प्रत्येकालाच कुतूहल आहे. कुतूहल असणंही साहाजिकच आहे म्हणा, दीर्घकाळ राजगादीवर असलेली ती ब्रिटिश राजघराण्यातली पहिली व्यक्ती आहे. जिच्या राज्याचा सूर्य कधीच मावळत नाही अशी सामान्य जनतेला आपलीशी वाटणाऱ्या या राणीने नव्वदी ओलांडली आहे. ब्रिटनमधल्याच लोकांना काय पण अनेकांना या राणीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल. या राणीबाबत एक गोष्ट समोर आली आहे. राणीचे अनेक फोटो तुम्ही कधीना कधी पाहिले असतील या फोटोंमध्ये एक गोष्ट तुमच्या पटकन लक्षात आली असेल ती म्हणजे राणी जिथे जिथे जाईल तिथे तिच्या हातात एक छोटीशी पर्स असते. तुम्ही म्हणाल यात काय वेगळं? सगळ्याच महिलांच्या हातात किंवा खांद्यावर पर्स असतेच, तेव्हा राणीने जर पर्स सोबत घेतली तर त्यात काय नवल. पण सोबत सतत पर्स बाळगण्यात राणीचे एक गुपित दडलं आहे. ही पर्स काही दिखावा किंवा पैसे ठेवण्यासाठी राणी सोबत बाळगत नाही तर तिच्या सहका-यांना सूचना देण्यासाठी ही बॅग तिच्या सोबत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : हे नियम ब्रिटनची राणीसुध्दा मोडू शकत नाही!

राणीच्या  महागड्या बॅगेत असून असून काय  काय असेल, फार फार तर पैसे किंवा मेकअपच सामान वगैरे असेल असं अनेकांना वाटतं. पण या गोष्टींसाठी राणी आपल्या सोबत बॅग अजिबात ठेवत नाही. एका इतिहासकाराने दिलेल्या माहितीनुसार राणी आपल्या सहकाऱ्यांना सूचना देण्यासाठी बॅग सोबत ठेवते. यामागे काही सिक्रेट साईन्स म्हणजेच इशारे असतात, या इशाऱ्यांचा अर्थ सहकाऱ्यांनी समजून लगेच तसा प्रतिसाद देणे अपेक्षित असतं. म्हणजे राणीला आता आपले संभाषण आवरतं घ्यायचं आहे किंवा तिला पुढच्या काही मिनिटांत त्या ठिकाणावरून निघायचे आहे असे अनेक इशारे आपल्या पर्सचा वापर करून राणी देत असते.

समजा राणीने आपल्या एका हातातली पर्स दुसऱ्या बाजूला घेतली तर तिला संभाषण थांबवायचे आहे असा अर्थ होतो. जर राणीने आपली बॅग टेबलवर ठेवली तर काही मिनिटांत ती तिथून निघणार आहे असा अर्थ होतो. एका इंग्रजी दैनिकाच्या माहितीनुसार राणीच्या पर्समध्ये फक्त एक फाऊंटन पेन, रुमाल आणि मिंट एवढ्याच वस्तू असतात. रविवारी चर्चमध्ये जाताना राणीच्या पर्समध्ये फक्त पैसे असतात. आश्चर्य म्हणजे फार फार तर राणी ५ किंवा १० पाउंड म्हणजे साधरण ४०० ते ८०० रुपये सोबत ठेवते, कारण चर्चला राणीने दान देण्याची पद्धत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To know about secret signals behind queen elizabeth handbag
First published on: 09-03-2017 at 10:01 IST