सातारकर आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठीच… सातारकरांसाठी आज आम्ही काही जुन्या आठवणी घेऊन आलो आहोत, हे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सातारा जिल्हा हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यांपैकी एक आहे. सर्वत्र आता शहरीकरण झाल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच गावाकडची जास्त ओढ असते. मात्र, वास्तव पाहायला गेलं तर आता गावोगावीही शहरीकरण पाहायला मिळतं. पहिल्यासारखे जुने वाडे, मातीची घरं आता पाहायला मिळत नाहीत. गावीही शहरासारखीच सिमेंट कॉंक्रीटची जंगले दिसतात. मात्र असं असलं तरीही काही गोष्टी अजूनही इतिहासाच्या साक्षीदार म्हणून भक्कम उभ्या आहेत. यातीलच एक म्हणजे बारा ‘बारामोटेची विहीर’. या विहीरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सातारा जिल्ह्यातल्या लिंब गावात असलेली सुमारे ३०० वर्ष जुनी ‘बारामोटेची विहीर’ हे एक असंच प्रसिद्ध ठिकाण. इ.स.वी.सन. १७१९ ते १७२४ या दरम्यान शाहू महाराजांची पत्नी वीरुबाई हिनं ही दगडी विहीर बांधल्याचं सांगितलं जातं. जवळपास १०० फूट खोल आणि ५० फुट रुंद असलेली ही विहीर गावकऱ्यांसाठी आजीवन पाण्याचा उत्तम स्रोत ठरली आहे. विहीर निर्माण करते वेळी ३३०० आंब्याची कलमं लावून इथे आमराईची निर्मिती करण्यात आली होती. इतिहासाची साक्ष देणारी ही विहीर आजही पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी तितकीच उपयोगी पडत आहे.

Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग १२२ : पुण्यातील ‘पत्र्या मारुती मंदिरा’च्या नावामागची नेमकी गोष्ट काय?
pune video really pandavas used to live in pune
VIDEO : पुण्यामधील ‘या’ भागात होतं पांडवांचं वास्तव्य! थेट पांडवकाळाशी संबंध
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पेशव्यांच्या, शाहुंच्या अनेक खासगी बैठकी, निवांत क्षण यांना साक्ष असलेली ही विहीर प्रसिद्ध झाली, ती तिच्या भिंतीवर कोरलेल्या व्याल आणि शलभ शिल्पांमुळे! व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचं शरीर. ही शिल्पं राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात. विहीरीच्या दक्षिण दिशेला ४ हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प दक्षिणेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी व्याघ्र शिल्पं पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात. अष्टकोनी विहीरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. विहीरीतील खासे बैठकीत कमळ, हत्ती, गणपती, मारुती ही शुभ चिन्हं चितारली आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हिंमत हारु नका! आनंद महिंद्रांनी सरफराज खानच्या वडिलांना दिली मोठी ऑफर, म्हणाले ‘प्रेरणादायी वडील…’

सध्या सोशल मीडियावर या विहिरीचा व्हिडिओ chetanmahindrakar या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तुम्ही सातारच्या बाहेरचे असाल आणि अजूनही ही जागा पाहिली नसेल, आणि नवनवीन ठिकाणी भेट देण्याची आवड असेल तर तुम्ही येथे भेट देऊ शकता. येथे आल्यावर तुम्हाला विहिरीचा आणि येथील राजवाड्याच्या संपूर्ण इतिहास याबाबत माहिती जाणून घेता येईल.