Mumbai Local Accident Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’ असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते.

लोकलच्या गर्दीची मुंबईकरांना सवय असते. पण अशात ज्यांना गर्दी असताना उतरायचं कसं हेच माहित नसतं किंवा घाईघाईत धावत्या ट्रेनमधून काहीजण उतरायला जातात आणि अशावेळेस ते स्वत:वरच संकट ओढावून घेतात. लोकलमध्ये होणाऱ्या अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात ट्रेनमधून उतरताना एका माणसाबरोबर भयंकर अपघात झाला, नेमकं काय घडलं जाणून घेऊ या…

घाटकोपर रेल्वे स्थानकावर अपघात (Ghatkopar Railway Station Accident)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, मुंबई लोकलमध्ये एक भयंकर अपघात झाला आहे. लोकलमधून रेल्वे स्थानकावर उतरताना हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. लोकलमधून उतरताना हा माणूस रेल्वे स्थानक आणि प्लॅटफॉर्मच्या मध्येच अडकला. ही दुर्घटना घाटकोपर रेल्वे स्थानकावर घडल्याचं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @bandhunews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ८ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “घाटकोपर स्थानकावर घाईघाईत ट्रेनमधून उतरताना एक प्रवासी प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकला”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

ट्रेनमधील अपघाताचा हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तो जिवंत आहे का”, तर दुसऱ्याने “ट्रेनचा गॅप कमी करा प्लीज” अशी कमेंट केली. तर या दुर्घटनेमध्ये त्याने आपले प्राण गमावले अशा सांगणाऱ्या कमेंट्सदेखील व्हिडीओला आल्या आहेत. दरम्यान, मुंबई लोकल अपघातांमध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.