Train Stunt Video: आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा स्टंटबाजी करताना पाहिली असेल; पण ते स्टंट खूप काळजी घेऊन केले जातात. सिनेमाची गोष्ट सोडली, तर आता अनेक जण मजा म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि स्टंट करतात. हे स्टंट पाहून अनेकदा आपल्याच अंगावर काटा येतो. या स्टंटबाजीमध्ये अनेकदा त्यांचा जीवदेखील जातो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात ट्रेनला लटकून असाच जीवघेणा स्टंट एका तरुणाने केलाय आणि हा स्टंट त्याच्या अंगलट आला आहे.

ट्रेन स्टंट व्हायरल व्हिडीओ (Shocking Video Train Accident)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल. व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुण ट्रेनबाहेर लटकत आहे. चालत्या ट्रेनच्या दरवाजात त्याचा हा स्टंट सुरू आहे. त्याने एका माणसाचा हात पकडला आहे आणि चालत्या ट्रेनमध्ये तो हे धक्कादायक कृत्य करताना दिसतोय.

ट्रेनच्या दरवाजाला लटकत असणारा हा तरुण स्टेशन आलं की त्या माणसाचा हात सोडतो आणि यामुळेच तो थेट ट्रेनखाली जातो. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकलं नाही. तसंच हा तरुण चोर असल्याचा दावा कमेंट सेक्शनमध्ये काही नेटकरी करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @newsdotz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ३ लाखांच्यावर व्ह्यूज आले आहेत. तसंच “घाई घातक ठरली! चालत्या रेल्वेतून उतरताना युवकाचा मृत्यू, फक्त काही सेकंदांची चूक आणि एका तरुणाचा जीव गमावण्याची वेळ आली. चालू रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न जीवावर बेतला. हा व्हिडिओ प्रत्येक प्रवाशाने पाहायलाच हवा, घाईचा काय परिणाम होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण!” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आता हे काय तो पोटासाठी करत होता का? अंगातली मस्ती जिरवण्यासाठी करत होता”, तर दुसऱ्याने “दोन महिन्यापूर्वी असाच व्हिडिओ आला होता की त्याला चोरी करताना पकडलं होतं. म्हणून त्याचे हात धरून ठेवले होते” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “त्याला लवकर घरी जायचं होतं ते गेला घरी लवकर” तर एकाने “गरज काय होती” अशी कमेंट केली.